शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळेबाज महाविद्यालय सील

By admin | Updated: January 4, 2015 23:11 IST

एमएसबीटी अंतर्गत तांत्रिक विषयाचे अभ्यासक्रम चालविणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील तीन संस्थाचालकांनी शासनाची बोगस विद्यार्थी दाखवून कोट्यावधी रूपयाची शिष्यवृत्ती लाटली आहे.

गडचिरोली : एमएसबीटी अंतर्गत तांत्रिक विषयाचे अभ्यासक्रम चालविणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील तीन संस्थाचालकांनी शासनाची बोगस विद्यार्थी दाखवून कोट्यावधी रूपयाची शिष्यवृत्ती लाटली आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर गडचिरोली पोलिसांच्या विशेष तपास अधिकाऱ्यांनी संबंधीत संस्थांतर्गत असलेल्या महाविद्यालयांची झडती घेऊन तेथील कागदपत्र जप्त केले व या महाविद्यालयांना आता सील ठोकण्यात आले आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले साईराम बहुउद्देशिय ग्रामीण विकास संस्था सावलीचे रोहित बोम्मावार, संकल्पसिध्दी बहुउद्देशिय विकास संस्थेचे अध्यक्ष अमित बंदे तसेच कै. राहूलभाऊ बोम्मावार कॉलेज आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड टेक्नालॉजी चामोर्शीचे सुरज बोम्मावार यांच्या मागावर पोलीस पथक फिरत आहे. हे तिनही संस्थाचालक अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून यांच्या घरीही पोलिसांचे पथक जाऊन त्यांच्याकडून कागदपत्र ताब्यात घेण्यात आले आहे. गडचिरोली शहरात मोटवानी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या शिवनेरी कॉलेजमध्येच बोम्मावारांच्या महाविद्यालयाचा संसार सुरू होता, अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे. बोम्मावार यांनी शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार केल्यानंतर आता नव्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी आरमोरी येथे पेट्रोल पंपाकरीताही अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न सुरू केला होता, अशी माहितीही पुढे आली आहे. बोम्मावारांनी आणखी काही बनावट नावावर संस्था स्थापन करून त्या माध्यमातूनही शिष्यवृत्ती लाटण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. पूर्व विदर्भात गोंदिया येथेही कॉलेज नसताना शिष्यवृत्ती उचलण्याचा प्रयत्न या संस्थेने केला, अशीही माहिती तपासत पुढे आली आहे. या प्रकरणी पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे व चामोर्शीचे मनोज नवसारे यांनी महाविद्यालयावर धाडी घालून तेथील कागदपत्र जप्त करण्याची कारवाई केली.