बोम्मावारांच्या संस्था कार्यालयात आढळले तहसीलदारांचे बनावट शिक्के

By Admin | Updated: January 5, 2015 23:03 IST2015-01-05T23:03:58+5:302015-01-05T23:03:58+5:30

एमएसबीटी अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या शिक्षण संस्थांच्या विरोधात गडचिरोली जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या

Fake stamps of Tehsildars found in Bommawar's office | बोम्मावारांच्या संस्था कार्यालयात आढळले तहसीलदारांचे बनावट शिक्के

बोम्मावारांच्या संस्था कार्यालयात आढळले तहसीलदारांचे बनावट शिक्के

गडचिरोली : एमएसबीटी अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या शिक्षण संस्थांच्या विरोधात गडचिरोली जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या संस्थाचालकांच्या महाविद्यालय व कार्यालयावर धाडी घालून तेथील दस्ताऐवज जप्त केले. चामोर्शी येथील कै. राहूलभाऊ बोम्मावार कॉलेज आॅफ मॅनेजमेंट अँड टेक्नालॉजीच्या कार्यालयात पोलिसांना चामोर्शी तहसीलदार, सावली तहसीलदार, तलाठी कार्यालय भेंडाळा व दुय्यम निबंधक कार्यालय चामोर्शी यांचे रबरी शिक्के आढळून आले आहे.
सरकारी कार्यालयाचे शिक्के बोम्मावार यांच्या संस्था कार्यालयात आढळून आल्याने पोलीस यंत्रणाही हादरलेली आहे. या प्रकरणी शिक्के कुठून आलेत याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे. ३ जानेवारी रोजी चामोर्शी येथील बोम्मावार यांच्या संस्था कार्यालयावर तपास अधिकारी चामोर्शीचे पोलीस निरिक्षक एम. एस. नवसरे यांनी धाड घातली. त्यावेळी त्यांना हे शिक्के आढळून आले आहे. बोम्मावार यांनी सदर शिक्के संबंधीत कार्यालयात चोरले की, बाहेरून तयार करून घेतले. याविषयी पोलीस त्यांची चौकशी करणार असल्याची अशी माहिती नवसरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. या प्रकरणी आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Fake stamps of Tehsildars found in Bommawar's office