शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकारी अभियंत्यास शेतकऱ्यांनी धरले धारेवर

By admin | Updated: October 5, 2015 01:47 IST

आरमोरी भागातील शेतीला पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारला आरमोरीच्या इटियाडोह प्रकल्पाच्या कार्यालयावर धडक देऊन ....

पाणी पुरवठा होणार : लेखी आश्वासनआरमोरी : आरमोरी भागातील शेतीला पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारला आरमोरीच्या इटियाडोह प्रकल्पाच्या कार्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन इटियाडोह प्रकल्प गोंदियाचे कार्यकारी अभियंता छप्परधारे हे रविवारी आरमोरीत दाखल झाले. यावेळी शिवसेनाचे माजी जिल्हा प्रमुख हरिष मने व शेकडो शेतकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. त्यानंतर आरमोरी भागातील शेतकऱ्यांना धानाचे पीक निघेपर्यंत पाणी पुरवठा केला जाईल, असे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. शेतीला पाणी पुरवठा होण्याच्या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता छप्परधारे यांना घेराव केला. पाणी वाटपाचे योग्य नियोजन करून तातडीने मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी रेटून धरली. त्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी शेतकऱ्यांना लेखी आश्वासन देऊन पाण्याची समस्या निकाली काढण्याची हमी दिली. आरमोरी टेलला असणाऱ्या सात पाणी वाटप संस्थांना हक्कदारीनुसार आरमोरी शून्यवरून १.१० मीटर गेजचे पाणी समान पध्दतीने देण्यात येईल. तसेच धानाचे उत्पन्न निघेपर्यंत सिंचन व्यवस्था सुरू राहिल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता छप्परधारे यांनी दिली. यावेळी राजू अंबानी, उपविभागीय अभियंता गोगटे, मेंढे, राठोड, नामदेव सोरते, शंकर घाटुरकर उपस्थित होते. (वार्ताहर)