शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्याला वीज दिली तरी तुमच्यावर दाखल हाेऊ शकताे चाेरीचा गुन्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 05:00 IST

घराला लागूनच दुकान आहे, तिथे स्वतंत्र मीटर न घेता घरातूनच वीजपुरवठा जोडलेला असेल, तरीदेखील कारवाई होऊ शकते. कृषिपंपाची वीज जर घरगुती कामासाठीसुद्धा वापरली असेल तरी वीजचाेरीचा गुन्हा दाखल हाेऊ शकते, अशी माहिती महावितरणकडून दिली आहे. आधुनिक तंत्राचा वापर करूनही वीज गळती आणि चोरी सुरूच आहे. या चोरट्या विजेचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांवर भुर्दंड टाकला जात आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : अनेकवेळा विद्युत देयक थकबाकी किंवा अन्य कारणांसाठी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा जोडून घेतला जातो; मात्र नकळत घडणारा हा प्रकार अंगलट येऊ शकतो. शेजाऱ्याकडून वीजपुरवठा घेणाऱ्यांवर आणि तो देणाऱ्यांवरही कारवाई केली जाऊ शकते. घराला लागूनच दुकान आहे, तिथे स्वतंत्र मीटर न घेता घरातूनच वीजपुरवठा जोडलेला असेल, तरीदेखील कारवाई होऊ शकते. कृषिपंपाची वीज जर घरगुती कामासाठीसुद्धा वापरली असेल तरी वीजचाेरीचा गुन्हा दाखल हाेऊ शकते, अशी माहिती महावितरणकडून दिली आहे. आधुनिक तंत्राचा वापर करूनही वीज गळती आणि चोरी सुरूच आहे. या चोरट्या विजेचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांवर भुर्दंड टाकला जात आहे. म्हणूनच महावितरण कंपनीने वीजचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मोहीम राबविली आहे.

कायदा काय सांगतो?शेजाऱ्यांकडून अनधिकृत पद्धतीने वीजपुरवठा घेणे, मंजूर वर्गवारीतून इतर वर्गवारीसाठी अनधिकृत वीज वापर केल्याप्रकरणी विद्युत कायदा २००३ मधील कलम १२६ नुसार कारवाई केली जाऊ शकते. मीटरशी छेडछाड, आकडा टाकून वीज वापर, सर्व्हिस वायरमध्येच खंडित करून थेट वीजपुरवठा केला असल्यास हा गंभीर गुन्हा माणून कलम १३५ नुसार कारवाई केली जाते. कलम १३५ नुसार कारवाई झाली असल्यास व त्याने एक दिवसही चाेरी केली असल्यास त्याला दंड  म्हणून किमान एक वर्षाच्या वीज बिलाच्या दुप्पट रक्क्म आकारली जाते. ताे किती वर्षांपासून चाेरी करीत आहे हे सिद्ध झाल्यास तेवढा दंड आकारला जाते. 

चोरी कळवा, अन् दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस म्हणून मिळवा- २००३ मध्ये तयार केलेल्या विद्युत कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. वाढत्या वीजचोरीला आळा घालण्याकरिता ‘वीजचोरी कळवा, बक्षीस मिळवा’, ही अभिनव योजनाही हाती घेण्यात आली आहे.- याअंतर्गत वीजचोरीची माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातात. एवढेच नव्हे, तर संबंधितास वीजचोराकडून वसूल करण्यात आलेल्या दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते. 

नागरिकांनी वीज चाेरी न करता अधिकृत वीजपुरवठा घ्यावा. वीज चाेरीच्या गुन्ह्यात संबंधिताला शिक्षाही हाेऊ शकते. वीजचाेरी पकडण्यासाठी महावितरणकडे स्वतंत्र पथक आहे. एखादा व्यक्ती वीज चाेरी करीत असल्यास त्याची माहिती महावितरणला द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गाेपनीय ठेवले जाईल. - रवींद्र गाडगे, अधीक्षक अभियंता, महावितरण, गडचिराेली 

 

टॅग्स :electricityवीज