शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

कृषीतील बायोमास प्रक्रियेतून रोजगार निर्मितीस वाव

By admin | Updated: August 27, 2016 01:24 IST

केवळ सरकारच्या भरवशावर विकासाच्या सर्व गोष्टी होऊ शकत नाही. विकासासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत,

सारंग गडकरी यांचे प्रतिपादन : जिल्हा बँकेत संयुक्त देयता गटांचा गौैरवगडचिरोली : केवळ सरकारच्या भरवशावर विकासाच्या सर्व गोष्टी होऊ शकत नाही. विकासासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत, कृषी क्षेत्रातील बायोेमास प्रक्रियेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीस मोठ्या प्रमाणात वाव आहे. हे आपण स्वानुभवाने शिकलो आहे, असे प्रतिपादन मानस अ‍ॅग्रो इंडिस्ट्रिज इन्फास्ट्रक्चर नागपूरचे संचालक सारंग नितीन गडकरी यांनी केले.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेच्या सभागृहात शुक्रवारी लघु व्यावसायिक सभासदांना मार्गदर्शन शिबिर व देयता गटांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार होते. विशेष अतिथी म्हणून बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे संचालक ईशांत पोरेड्डीवार, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी योगेंद्र शेंडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. पी. आयलवार आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोेलताना सारंग गडकरी म्हणाले, लोकांना कर्जासाठी प्रवृत्त करणारी गडचिरोली ही माझ्या पाहणीतील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. या बँकेमार्फत सर्वसामान्यांना आर्थिक विकास व बचतीचे धडे देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर या पूर्व विदर्भातील जिल्ह्यात धानपीक मोठ्या प्रमाणात होते. शेतीतील उत्पादन निघाल्यानंतर तणस व इतर टाकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणात निघतात. या वस्तूंपासून अनेक पक्क्या वस्तू तयार करण्याचे काम होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात राईस मिल कल्चर विकसित होण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते, अशा विकासात्मक कामासाठी गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी पुढे यावे, त्यांना आपण संपूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले. रोजगार मागणारे होण्यापेक्षा इतरांना रोजगार देणारे आपण सर्व झालो पाहिजेत, गडचिरोली जिल्ह्यात खनिज व वनसंपत्ती मोठ्या प्रमाणात असल्याने कौशल्य विकासातून येथे रोजगार निर्मितीची भरभराट होऊ शकते, असेही ते म्हणाले. बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले, गडचिरोलीची उद्योगविरहीत जिल्हा म्हणून सर्वत्र ओेळख आहे. मात्र कौैशल्य विकासाच्या माध्यमातून या जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग व प्रकल्प तसेच लघु प्रकल्प निर्माण झाले पाहिजे, यातून लघु उद्योगी गडचिरोली जिल्हा, अशी ओळख महाराष्ट्रात झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, संचालन व्यवस्थापक अरूण निंबेकर यांनी केले. तर आभार सहायक व्यवस्थापक आर. वाय. सोरते यांनी मानले. याप्रसंगी यशस्वी कार्य करणाऱ्या संयुक्त देयता गटांच्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)