शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराचा पूर्व भाग नदीत गडप होण्याची शक्यता

By admin | Updated: February 20, 2017 00:39 IST

विदर्भाची काशी म्हणून सर्वदूर परिचीत असलेल्या मार्कंडेश्वर मंदिराच्या पूर्वेकडील भागावरील माती नदीपात्रात सरकत चालली आहे.

पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष : मार्कंडात वैनगंगेच्या प्रवाहाने माती वाहून जात आहेसंतोष सुरपाम मार्कंडादेवविदर्भाची काशी म्हणून सर्वदूर परिचीत असलेल्या मार्कंडेश्वर मंदिराच्या पूर्वेकडील भागावरील माती नदीपात्रात सरकत चालली आहे. त्यामुळे हा भाग वैनगंगा नदीत गडप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे पुरातत्व विभागाने लक्ष देऊन तत्काळ नदी किनाऱ्याला संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी होत आहे. मार्कंडेश्वर मंदिर समूह अत्यंत प्राचिन असून सदर मंदिर वैनगंगा नदीच्या अगदी काठावर वसलेला आहे. या ठिकाणी उत्तरवाहिणी वैनगंगा नदी आहे. नदी किनारा ते मंदिर परिसर या भागात संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नाही. मंदिराच्या पूर्वेकडील वैनगंगा नदीमध्ये उतरल्यानंतर खडकावरून अवलोकन केल्यास पाण्याच्या प्रवाहाने दरवर्षी नदी पात्र कोसळत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वेकडील भागाला संरक्षक भिंत, पायऱ्या व दगडाची पिंचींग करणे आवश्यक आहे. असे न करण्यात आल्याने प्राचिन मंदिर नदीमध्ये गडप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत पुरातत्व विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी पूर्वेकडील भागाची पाहणी करून येथे संरक्षक भिंतीचे काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या या प्राचिन मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरू असून देवालय सुस्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे मंदिर अमूल्य ठेवा असून तो व्यवस्थित ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाने आवश्यक ती पावले उचलावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरवर्षी वैनगंगा नदीला मोठा पूर येतो. या पुरात माती वाहून जात आहे व खडक उघडे पडत आहेत. नदीच्या किनाऱ्याला लागूनच मंदिर असल्याने हळूहळू माती खचू लागली आहे. त्यामुळे या भागात संरक्षक भिंत उभारणे गरजेचे झाले आहे.