शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंध शिथिल झाल्याने एसटीच्या बसफेऱ्या सुरू, पण प्रवासी घरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 05:00 IST

सोमवारपासून एसटीच्या बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली. असे असले तरी एसटी महामंडळाचे अधिकारी पुरेसे प्रवासी असतील तरच बसफेरी सोडण्यास परवानगी देत आहेत. सध्या गडचिरोली विभागांतर्गत ५० बसेस सुरू आहेत. त्यांच्या दिवसातून १०० फेऱ्या होत आहेत. त्यामुळे महामंडळाला दिवसाकाठी ५ लाखांचेे उत्पन्न होत आहे. अजून बऱ्याच बसगाड्या धावणे सुरू झालेले नाही.

ठळक मुद्देअनेक मार्गांवरील फेऱ्या हाेताहेत प्रवाशांअभावी रद्द

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल दोन महिन्यानंतर जिल्ह्यातील लॉकडाऊनचे निर्बंध बऱ्याच प्रमाणात शिथिल झाले आहेत. अनेक व्यवहारही सुरू झाले. पण बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दोन दिवसात मोजकीच होती. त्यामुळे एसटीच्या अनेक फेऱ्याही सुरू होऊ शकलेल्या नाहीत. कोरोना कमी झाला असला तरी पूर्ण गेलेला नाही, हे लक्षात ठेवत लोक अत्यावश्यक कामासाठीच प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत.सोमवारपासून एसटीच्या बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली. असे असले तरी एसटी महामंडळाचे अधिकारी पुरेसे प्रवासी असतील तरच बसफेरी सोडण्यास परवानगी देत आहेत. सध्या गडचिरोली विभागांतर्गत ५० बसेस सुरू आहेत. त्यांच्या दिवसातून १०० फेऱ्या होत आहेत. त्यामुळे महामंडळाला दिवसाकाठी ५ लाखांचेे उत्पन्न होत आहे. अजून बऱ्याच बसगाड्या धावणे सुरू झालेले नाही.जिल्ह्यात सध्या चंद्रपूर, नागपूर, अहेरी या मार्गावर सर्वात जास्त बसफेऱ्या आहेत. प्रवासी संख्या वाढेल तसतशा इतर मार्गावर बसफेऱ्या सोडल्या जाणार आहेत. तोट्यात बसफेऱ्या चालविण्यास एसटीचे अधिकारी तयार नाहीत. परिणामी अनेक चालक-वाहकांना सध्या काम नाही.

ट्रॅव्हल्स बसेस बंदचनागपूर, चंद्रपूरसह काही प्रमुख मार्गांवर खासगी ट्रॅव्हल्स बसेस माेठ्या प्रमाणावर चालतात. पण लाॅकडाऊनमध्ये शिथीलता मिळाल्यानंतर अजून लाेक प्रवास करण्यास बाहेर पडत नसल्याने ट्रॅव्हल्सच्या बसेस अजुन सुरू झालेल्या नाहीत.

प्रशासनाने परवानगी दिली असली तरी एसटी बसेस चालवताना डिझेलचा खर्चही परवडला पाहिजे. लोकांना जसजसे समजेल तसतसे प्रवासी वाढली. त्यासोबत एसटीच्या फेऱ्याही वाढेल. - अशोक वाडिभस्मे, विभाग नियंत्रक

प्रवासासाठी प्रत्येकाची वेगवेगळी कारणे

तीन महिन्यानंतर मी आता शहराबाहेर निघालो. चामोर्शीला घरगुती कार्यक्रमासाठी जात आहे. लांबच्या प्रवासाची मात्र अजून हिंमत होत नाही.काेराेनाची भिती अजून कायम आहे.- दिवाकर कोपुलवार

मी बँकेत अस्थायी कर्मचारी आहे. लॉकडाऊनमध्ये चामोर्शीवरून काही जण मिळून एकाच्या कारने येत होतो. आता एसटी सुरू झाल्याने प्रवासाची सोय झाली. त्यामुळे खर्चही वाचणार आहे.- स्वप्निल अहिलावार 

परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी कॉलेजला आले होते. लॉकडाऊनमुळे आतापर्यंत गडचिरोलीत येणे शक्य झाले नाही. दर्शनी गावाला परत जाण्यासाठी दोन तासापासून गाडीची वाट पहात आहे.- आरती गिरी 

दिवाळीनंतर पहिल्यांदा माहेरी वडिलांच्या भेटीला आली होती. पण शेतीचा हंगाम सुरू झाल्याने दोनच दिवसात सासरी परत जावे लागत आहे. एसटी बस सुरू झाल्याने दाेन दिवसासाठी का असेना, ही भेट हाेऊ शकली.- शैला शरद मांदाळे

 

टॅग्स :state transportएसटी