शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
5
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
6
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
7
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
8
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
9
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
10
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
11
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
14
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
15
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
16
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
17
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
18
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
19
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
20
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी धान राेवणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST

राेवणी करण्यासाठी सर्वप्रथम पऱ्हे टाकले जातात. हे पऱ्हे २० दिवसांच्या कालावधीत दुसऱ्या बांधीत राेवावे लागतात. त्यापेक्षा उशीर झाल्यास धानाच्या उत्पादनात घट हाेते. धानाचे पऱ्हे टाकल्याला आता २० दिवसांपेक्षा अधिक कालावधी हाेत चालला आहे. धानाच्या राेवणीसाठी शेतकऱ्यांनी शेत तयार करून ठेवले आहेत. मात्र पाऊस पडत नसल्याने राेवणीची कामे रखडली आहेत. 

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा, कडक उन्हामुळे पिकांना धाेका; मशागतीची कामे पूर्ण

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : धानाचे पऱ्हे राेवणी याेग्य झाली आहेत. मात्र पाऊस नसल्याने राेवणीची कामे रखडली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे. असेच शेतकरी धानाची राेवणी करीत असल्याचे दिसून येत आहे. 
गडचिराेली जिल्ह्यात सुमारे दाेन लाख हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. येथील अर्थव्यवस्था धानाच्या शेतीवर अवलंबून आहे. जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर धानाची राेवणी केली जाते, तर ५० हजार हेक्टर क्षेत्रावर आवत्या पद्धतीने धानाची लागवड केली जाते. 
राेवणी करण्यासाठी सर्वप्रथम पऱ्हे टाकले जातात. हे पऱ्हे २० दिवसांच्या कालावधीत दुसऱ्या बांधीत राेवावे लागतात. त्यापेक्षा उशीर झाल्यास धानाच्या उत्पादनात घट हाेते. धानाचे पऱ्हे टाकल्याला आता २० दिवसांपेक्षा अधिक कालावधी हाेत चालला आहे. धानाच्या राेवणीसाठी शेतकऱ्यांनी शेत तयार करून ठेवले आहेत. मात्र पाऊस पडत नसल्याने राेवणीची कामे रखडली आहेत. 

धानाची राेवणी उशिरा झाल्यास उत्पादनात घट हाेते. असा दरवर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी माझ्या शेतात सर्वाधिक आवत्याच टाकला आहे. कृषी विभाग धान लागवडीच्या नवनवीन पद्धती आणत आहे. त्याचा अवलंब करण्याची गरज आहे. पुढच्या वर्षी मी धानाची पेरणी करणार आहे. 
-नागेश दाेडके, शेतकरी

नायलाज म्हणून धानाची शेती करावी लागत आहे. दरवर्षीच पावसाचे विघ्न येतात. यावर्षी आता धानाचे पऱ्हे राेवण्याजाेेगे झाले आहेत. मात्र पाऊस नसल्याने राेवणीची कामे खाेळंबली आहेत. दमदार पाऊस पडल्यानंतर शेतकरी एकाचवेळी राेवणे सुरू करतात, अशावेळी मजुरी मिळत नाही. 
- रमेश उसेंडी, शेतकरी

कापसाचा पेरा वाढला
- जिल्ह्यात दरवर्षी कापसाचा पेरा वाढत चालला आहे. साेयाबीनची जागा आता कापूस घेत आहे. ज्या जागेवर साेयाबीन लावले जात हाेते. त्या ठिकाणी आता कापसाची लागवड केली जात आहे. धानानंतर कापसाचा पेरा जिल्ह्यात सर्वाधिक आहे. 

सिंचन असलेल्यांचे कमी खर्चात राेवणे
जिल्ह्यातील अत्यंत कमी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. विशेषकरून ज्या शेतकऱ्यांचे शेत वैनगंगा नदीला लागून आहे. अशाच शेतकऱ्यांकडे माेटरपंपची सुविधा आहे. अशाच शेतकऱ्यांचे धानाचे राेवणे सुरू आहेत. प्रत्येक गावात एक ते दाेनच शेतकऱ्यांकडे माेटरपंप आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे राेवणे सुरू नसल्याने अत्यंत कमी दरात मजूर उपलब्ध हाेत आहे. दमदार पाऊस सुरू झाल्यानंतर एकाचवेळी शेतकरी राेवणे सुरू करतात. त्यावेळी मजूर मिळत नाही.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती