कोरोनाचा बाऊ नको, काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 05:00 AM2020-08-06T05:00:00+5:302020-08-06T05:01:03+5:30

नर्सिंग कॉलेजच्या स्टुडंट्स नर्सिंग असोसिएशन चातगावच्या वतीने धानोरा तालुक्याच्या कुडकवाही येथे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ४ जुलै रोजी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. दरम्यान गावातील नागरिकांना याप्रसंगी कोरोनाची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Don't be a coroner, be careful | कोरोनाचा बाऊ नको, काळजी घ्या

कोरोनाचा बाऊ नको, काळजी घ्या

Next
ठळक मुद्देडॉ.साळवे यांचे प्रतिपादन : कुडकवाही येथे कोरोना जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : नागरिकांनी कोरोनाचा उगीच बाऊ करू नये, आवश्यक ती काळजी घ्यावी, कोरोनाला घाबरू नये, असे प्रतिपादन डॉ.साळवे नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे सरचिटणीस डॉ.प्रमोद साळवे यांनी केले.
नर्सिंग कॉलेजच्या स्टुडंट्स नर्सिंग असोसिएशन चातगावच्या वतीने धानोरा तालुक्याच्या कुडकवाही येथे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ४ जुलै रोजी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. दरम्यान गावातील नागरिकांना याप्रसंगी कोरोनाची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नागरिकांना मास्कचे वितरण करून ते गर्दीच्या ठिकाणी घालण्याचा सल्ला देण्यात आला.
यावेळी डॉ.साळवे म्हणाले, देशात व जगात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनावर अजून कोणतीही लस, औषध उपलब्ध झालेली नाही. वाढत्या प्रादुर्भावामुळे जनतेत दहशत निर्माण झालेली आहे. काही मंडळी व संस्था कोरोनाच्या नावावर सामान्य जनतेला वेठीस धरत आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे जनता हतबल झाली असली तरी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेतल्यास कोरोनाचा संसर्ग होत नाही. फिजिकल डिन्स्टन्सिंग, मास्कचा वापर करून योग्य आहार-विहार पथ्थ्यांचे पालन करून कोरोनाला पळवा, असे आवाहन डॉ.साळवे यांनी केले. याप्रसंगी असोसिएशनच्या अध्यक्ष अबोली त्रिसुले यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अजय चांग, रोशन करंडे, लखन साखरे, संतोष वड्डे, रामदास चांग, जिजा चांग, महानंदा मेश्राम आदींनी सहकार्य केले.

Web Title: Don't be a coroner, be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.