शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

फायर ऑडिटचे काम तात्काळ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST

गडचिरोली : शासकीय दवाखान्याच्या फायर ऑडिटसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही. फायर ऑडिटचे काम तात्काळ करावे, असे प्रतिपादन ...

गडचिरोली : शासकीय दवाखान्याच्या फायर ऑडिटसाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही. फायर ऑडिटचे काम तात्काळ करावे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. गडचिरोली येथे आरोग्यविषयक सुविधांचा आढावा घेण्यासाठी आले होते.

भंडारा येथील घटनेसारखी दुर्दैवी घटना दुसऱ्या रुग्णालयात घडू नये यासाठी प्रशासनाने सतर्क असले पाहिजे. त्यासाठी आवश्यक उपाययाेजना कराव्यात. रुग्णालयांमध्ये सुविधा पुरविण्यासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक घेऊन गडचिराेली जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत असणाऱ्या मागण्यांबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिले. कोरोना परिस्थिती, मलेरिया साथ, रिक्त पदे, इतर अडीअडचणी त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. राज्य शासनाने नुकताच रिक्त पदांपैकी ५० टक्के जागा भरा असा आदेश दिला आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा पदभरती वेळेत होईल. आरक्षण हा मुद्दा राज्यभर सध्या सुरू आहे. त्यावरही लवकरच तोडगा निघेल असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश सोलंके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. बागराज धुर्वे, डाॅ. माधुरी किलनाके, डॉ. विनोद म्हशाखेत्री, अधिसेविका नंदा मेश्राम, सहायक अधिसेविका शंकर ताेगरे आदी हजर हाेते. यावेळी ३५ वर्षांची सेवा केलेल्या व नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या अधिसेविका शालिनी कुमरे यांचा राज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट परिचारिका राष्ट्रपती पुरस्कारासाठी त्यांचे नामांकन करण्यात आले आहे.

बाॅक्स ........

अतिदक्षता विभागातील सुविधांची प्रशंसा

राज्यातील लीलावती, ब्रिच कँडी या सुप्रसिद्ध रूग्णालयाप्रमाणे गडचिराेली जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला आहे. लाईट, ऑक्सिजन व इतर व्यवस्था अतिशय उत्तम आहे, असे गाैरवाेद्गार राज्यमंत्री यड्रावकर यांनी केले. नव्याने स्थापन झालेल्या आरटीपीसीआर लॅबची पाहणी केली.