शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमासाठी जिल्ह्याचा सन्मान

By admin | Updated: July 17, 2015 01:38 IST

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमासाठी ,,,,

चार वैद्यकीय अधिकारी : कुरखेडा रुग्णालयाचे रक्त संक्रमण केंद्र सन्मानित
गडचिरोली : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांचा पुणे येथे मंगळवारी सत्कार करण्यात आला.
गडचिरोली जिल्ह्यातून उपजिल्हा रुग्णालय कुरखेडाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार माळाकोळीकर, आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया उईके, कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. व्ही. ठाकर, आरमोरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव मोरे यांचा सत्कार करण्यात आला. तर रक्त संक्रमणाच्या कामात उत्कृष्ट कार्य करणारे रक्त साठवण केंद्र म्हणून उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा केंद्राचाही या कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात आला. डॉ. नंदकुमार माळाकोळीकर यांनी सन २०१४-१५ या वर्षात ३७४ सिझेरियन शस्त्रक्रिया, ११५० प्रसूती शस्त्रक्रिया केल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रशिक्षित प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ यांच्या कामातील हे सर्वात उत्कृष्ट काम राज्यात ठरले आहे. २०१२ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्यातर्फे डॉ. माळाकोळीकर यांचा याच उल्लेखनीय कार्यासाठी सन्मान करण्यात आला होता. डॉ. नंदकुमार माळाकोळीकर यांचा राज्य कुटुंब कल्याण कार्यक्रम पुणेच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतिश पवार, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबईच्या संचालक आय. ए. कुंदन, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
गडचिरोली या दुर्गम व अतिदुर्गम जिल्ह्यात राज्य सरकारच्या आरोग्य सेवेवरच सर्वाधिक भार आहे. विशेषत: महिलांच्या प्रसूतीविषयक तसेच नवजात बालकांचा जन्म-मृत्यू दर वाढविण्याच्या कामात वैद्यकीय सेवेत चार अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. महिलांच्या संस्थात्मक प्रसूती वाढविण्याच्या कामातही या वैद्यकीय अधिकाऱ्यांची मोलाची भूमिका राहिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)