शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेवर सावकार गटाचेच वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 05:00 IST

बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत त्यांच्या संपूर्ण संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाल्यामुळे अध्यक्षपदी पुन्हा प्रंचित पोरेड्डीवार यांनाच संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विभागीय सहनिबंधक (नागपूर) हे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी अधिसूचना काढतील. त्यानंतर १५ दिवसांच्या आत ही निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

ठळक मुद्देसर्व संचालकांची बिनविरोध निवड; २० संचालकांना पुन्हा मिळाली संधी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या सहकार क्षेत्रात नावाजलेल्या येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. सर्व २१ संचालक बिनविरोध निवडून आल्यामुळे या बँकेवरील पोरेड्डीवार सावकार गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर खाडे यांनी सदर निवडणूक प्रक्रिया पार पाडली.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी बँकेचा निवडणूक कार्यक्रम लावला होता. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांनी अधिसूचना काढली होती. त्यानुसार १४ जानेवारीला निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन दि.२० पर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात आली. बँकेच्या २१ संचालकांच्या जागांसाठी २१ जणांचेच नामांकन आले. दि.२१ ला छाननी होऊन दि.२२ जानेवारीला पात्र उमेदवारांची सूची प्रसिद्ध करण्यात आली. ५ फेब्रुवारीपर्यंत नामांकन मागे घेण्याची मुदत होती; पण जेवढ्या जागा तेवढेच नामांकन असल्यामुळे कोणीही निवडणुकीतून माघार घेतली नाही. त्यामुळे दि.६ ला सर्व संचालकांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. आता अध्यक्षपदाच्या निवडीची प्रतीक्षा राहणार आहे.

प्रंचित पोरेड्डीवार पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होणारबँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत त्यांच्या संपूर्ण संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाल्यामुळे अध्यक्षपदी पुन्हा प्रंचित पोरेड्डीवार यांनाच संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विभागीय सहनिबंधक (नागपूर) हे अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी अधिसूचना काढतील. त्यानंतर १५ दिवसांच्या आत ही निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

संचालकांमध्ये यांचा समावेशबिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये अ-गटातून झंजाळ मुरलीधर रेमाजी (ता.गडचिरोली), भोयर दुर्वेश बाबूराव (ता. आरमोरी), तितीरमारे पोपटराव मन्साराम (ता. देसाईगंज), डोंगरवार खेमनाथ सीताराम (ता. कुरखेडा-कोरची), साळवे अनंत घनश्यामजी (ता.धानोरा), गण्यारपवार अमोल गंगाधर (चामोर्शी-मुलचेरा), नागुलवार अतुल रामन्नाजी (ता.अहेरी), गेडाम वासुदेव उरकुडा (एटापल्ली-भामरागड), भंडारी श्रीहरी नागन्ना (ता.सिरोंचा), तसेच ब-गटातून पोरेड्डीवार इशांत राजेंद्र (शेतीमाल प्रक्रिया संस्था), क-गटातून पोरेड्डीवार अरविंद नामदेवराव (कृषी पणन संस्था), ई-गटातून वाघरे सुलोचना खुशालराव (विणकर, ग्राहक व इतर संस्था), ग-गटातून पोरेड्डीवार प्रंचित अरविंद (नागरी सहकारी बँका), य-गटातून पोरेड्डीवार प्रकाश नामदेवराव (इतर सहकारी संस्था), ड-गट लाकडे बळवंत मारोतराव (वैयक्तिक भागधारक व इतर), र-गटातून वालदे हिरालाल जीवन (अजा, अज राखीव), देशमुख शशिकला ज्ञानेश्वर (महिला राखीव), नाकाडे मीराबाई यादवराव (महिला राखीव), ऐलावार बंडूजी सोमन्नाजी (विजा, भज, विमाप्र राखीव), वाढई भैयाजी मारोती (इमाव राखीव) यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :bankबँकElectionनिवडणूक