महिला रुग्णालयात गरजू महिलांना सॅनिटरी पॅडचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:34 IST2021-03-08T04:34:13+5:302021-03-08T04:34:13+5:30

गडचिराेली : स्थानिक शासकीय महिला व बाल रुग्णालयात लायन्स क्लब, गडचिरोलीच्यावतीने नुकतेच गरजू महिलांसाठी २ हजार नग सॅनिटरी पॅड ...

Distribution of sanitary pads to needy women in women's hospitals | महिला रुग्णालयात गरजू महिलांना सॅनिटरी पॅडचे वितरण

महिला रुग्णालयात गरजू महिलांना सॅनिटरी पॅडचे वितरण

गडचिराेली : स्थानिक शासकीय महिला व बाल रुग्णालयात लायन्स क्लब, गडचिरोलीच्यावतीने नुकतेच गरजू महिलांसाठी २ हजार नग सॅनिटरी पॅड महिला रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

गडचिरोली येथील स्थानिक महिला व बाल रुग्णालयात, गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर, भंडारा तसेच लगतच्या छत्तीसगड राज्यातूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर गरजू महिला, स्थानिक महिला रुग्णालयात येत असतात. बेडच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण या रुग्णालयात येत असल्यामुळे बऱ्याचवेळा आवश्यक सुविधा रुग्णांना पुरविताना प्रशासनाची तारांबळ उडते. अशावेळी मदतीचा हात म्हणून लायन्स क्लब, गडचिरोलीच्यावतीने फूल ना फुलाची पाकळी स्वरूपात वेळोवेळी मदत केली जाते. नुकतीच सॅनिटरी पॅडची गरज लक्षात घेता लायन्स क्लब, गडचिरोलीच्यावतीने दाेन हजार सॅनिटरी पॅड रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सोयाम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रा. संध्या येलेकर, सचिव सतीश पवार, कोषाध्यक्ष मंजुषा मोरे, सहसचिव मनीष बोरेवार, मदत जिवानी, सुरेश लडके, शेषराव येलेकर, देवानंद कामडी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Distribution of sanitary pads to needy women in women's hospitals