शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अंकिसाच्या तलावाला इकॉर्नियाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:10 IST

अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे दोन तलाव आहेत. या तलावांचा दरवर्षी लिलाव होतो. लिलावानंतर काही नागरिक मासे सोडतात. ...

अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे दोन तलाव आहेत. या तलावांचा दरवर्षी लिलाव होतो. लिलावानंतर काही नागरिक मासे सोडतात. परंतु संपूर्ण तलावाला इकॉर्निया वनस्पतीने विळखा घातल्याने तलावातील पाणी साठवणुकीवर परिणाम होत आहे. शिवाय येथे मासेमारी करण्यास अडचणी येत आहेत.

सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता नदी आहे. याशिवाय लहान नद्या आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये बोअर करून तसेच विहिरी खोदून पाण्याची व्यवस्था केली आहे. या माध्यमातून शेतकरी उन्हाळी धानपीक, मका, मिरची, भाजीपाल्यासह विविध पिके घेतात. गावालगत दोेन तलाव असल्याने या तलावांचा दरवर्षी लिलाव स्थानिक प्रशासनामार्फत केला जातो. लिलावानंतर दरवर्षी पावसाळ्यात लिलावातून मालकी प्राप्त झालेले नागरिक येथे मत्स्यबीज टाकतात. दिवाळी व मकरसंक्रांतीनंतर या मत्स्यबीजाची बऱ्यापैकी वाढ होते. वाढ झाल्यानंतर मत्स्यबीजाची विक्री करण्याकरिता संबंधित नागरिक तलावातील मासे पकडतात. परंतु या तलावाला इकॉर्निया वनस्पतीचा विळखा असल्याने मासे पकडण्यासाठी योग्य प्रकारे जाळ टाकता येत नाही. सध्या संपूर्ण तलावात इकॉर्निया वनस्पती दिसून येते. सदर वनस्पती सध्या फुलली असल्याने उठावदार दृश्य दिसून येते. असे असले तरी या वनस्पतीमुळे तलावातील जलसाठा क्षमतेवर परिणाम होत आहे.

जवळपास दोन ते तीन फूट ही वनस्पती वाढते. दरवर्षी एप्रिल महिन्यात फूल येऊन त्यातील बिया खाली गळतात. त्यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा त्या उगवतात. विशेष म्हणजे एका वर्षी वाढलेली ही वनस्पती तलावात पूर्णत: कुजून मातीमोल होते. त्यामुळे तलावाच्या आतील भाग दरवर्षी उथळ होत असते. याचा परिणाम पाणी साठवणुकीवर होत आहे. या तलावातील गाळाचा उपसा करणे आवश्यक आहे. सोबतच पावसाळ्यानंतर विशेषत: जानेवारी महिन्यात फुले येण्याआधी या वनस्पतीची विल्हेवाट लावावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.