शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या उपकारांची परतफेड करणे कठीण - राजकुमार बडोले

By admin | Updated: January 18, 2016 01:32 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची परतफेड आपण करू शकत नाही. त्यांनी भारत देशाला दिलेल्या संविधानामुळेच बहुजनांना खऱ्या अर्थाने ...

हजारोंची उपस्थिती : मोहटोला येथे भगवान बुध्दांच्या मूर्तीचे अनावरणदेसाईगंज : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची परतफेड आपण करू शकत नाही. त्यांनी भारत देशाला दिलेल्या संविधानामुळेच बहुजनांना खऱ्या अर्थाने समता आणि स्वातंत्र्यता मिळाली, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. तालुक्यातील मोहटोला येथे रविवारी आनंद बुध्द विहाराच्या अनावरणप्रसंगी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भंते नागार्जून सुरई ससाई, आमदार क्रिष्णा गजबे, भंते नागघोष, भंते नागसेन, भंते नागधम्मा, भंते धम्माबोदी, जि.प.चे समाज कल्याण सभापती विश्वास भोवते, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आविसचे नंदू नरोटे, विजय बन्सोड, डॉ. विजय मेश्राम, चंद्रशेखर बांबोळे, देसाईगंज न.प.चे बांधकाम सभापती मोतीलाल कुकरेजा, माजी जि.प. सदस्य यादवराव ठाकरे, सरपंच हिरालाल शेंडे, संजय गणवीर, रमेश घुटके, दिगांबर मेश्राम आदी उपस्थित होते.बौध्द समाज तथा रमाबाई महिला मंडळाच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री बडोले यांच्या हस्ते भगवान बुध्दांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. तथागत बुध्दाच्या प्रज्ञा, शील, करूणेचे प्रतिबिंब प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पळावे, तसेच प्रत्येकांनी समता, बंधूता या नात्याने जीवन घालवावे, असे आवाहन नामदार बडोले यांनी यावेळी केले. याप्रसंगी आमदार क्रिष्णा गजबे व उपस्थित भंतेंनी बौध्द उपासक व उपासीकेंना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद घुटके, चरणदास लोखंडे, अशोक घुटके, नेत्रकला लोखंडे, भागवत शेंडे, अमरदास शेंडे, गोसावी चहांदे यांच्यासह बौध्द समाज, रमाई महिला मंडळ, भारतीय बौध्द महासभा, दलित वस्ती सुधार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी दादाजी चहांदे यांचा सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)