शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वैरागडातील ऐतिहासिक वास्तू नष्ट हाेण्याचा धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:36 IST

वैरागड : येथून १५ किमी अंतरावर असलेल्या वैरागड येथे ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वर, गोरजाई मंदिर, आदिशक्ती माता व हेमाडपंती मंदिरे ...

वैरागड : येथून १५ किमी अंतरावर असलेल्या वैरागड येथे ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वर, गोरजाई मंदिर, आदिशक्ती माता व हेमाडपंती मंदिरे आहेत. मात्र या मंदिरांच्या डागडुजीकडे पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केल्याने ही मंदिरे शेवटच्या घटका मोजत आहेत.

वैरागड येथील लाखमोलाच्या स्थळांची दुर्दशा मन खिन्न करणारी आहे. गावाच्या पूर्वेला वैलोचना नदीच्या तीरावर गोरजाई मंदिर आहे. मागील १० वर्षांपासून माना समाज बांधव डिसेंबर महिन्यात या ठिकाणी यात्रा भरवितात. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या या मंदिराची भग्न अवस्था निर्माण झाली आहे. मंदिराच्या घुमटाची गोरजाई देवस्थान समितीने थोडीफार दुरुस्ती केली पण मंदिराच्या सुरेख सभामंडपाचे दगड फुटले आहेत. शेकडो वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस सहन करत असलेल्या मंदिराचा बराच भाग जीर्ण झाला आहे.

ऐतिहासिक किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम भारतीय पुरातत्त्व विभागाने सन २०१५ मध्ये हाती घेतले. चार-पाच वर्षे किल्ल्याच्या दर्शनी भागातील मुख्य दरवाजाच्या दुरुस्तीचे काम चालले. जानेवारी २०२० पासून किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम कायमचे थांबले. २१ एप्रिल १९४५ च्या प्राचीन स्मारक तथा पुरातत्त्वीय स्थळ आणि अवशेष १९५८ च्या अंतर्गत वैरागड येथील किल्ला, भंडारेश्वर मंदिर पुरातत्त्व स्थळ म्हणून घोषित केले आहे. भंडारेश्वर मंदिराच्या डागडुजीचे काम बऱ्याच प्रमाणात झाले.