सात ड्रम मोहफूल सडवा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:29+5:30

बुर्कमरपल्ली येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री सुरू होती. याचा त्रास गावातील महिलांना सहन करावा लागत होता. गावातील दारू हद्दपार करण्यासाठी तालुका चमू व गावसंघटनेची काही दिवसांपूर्वी बैठक पार पडली. या बैठकीत दारुमुक्त गाव करण्याचा निर्णय सर्वानुमते पारित करण्यात आला. त्यानुसार गावातील दारू विक्रेत्यांना नोटीस बजावून दारुविक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Destroy seven drums | सात ड्रम मोहफूल सडवा नष्ट

सात ड्रम मोहफूल सडवा नष्ट

Next
ठळक मुद्देबुर्कमरपल्ली येथे कारवाई : मुक्तिपथ गाव संघटना व बचत गटाकडून ६ घरांची झडती

लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील बुर्कमरपल्ली येथील ६ अवैध दारू विक्रेत्यांच्या घराची झडती घेऊन व जंगल परिसरात शोधमोहीम राबवून मिळालेला ७ ड्रम मोहसडवा व मोहफुलाची दारू मुक्तिपथ अभियानाच्या पुढाकारातून गाव संघटना व बचत गटाच्या महिलांनी नष्ट केला. रविवारी ही अहिंसक कृती करण्यात आली.
बुर्कमरपल्ली येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री सुरू होती. याचा त्रास गावातील महिलांना सहन करावा लागत होता. गावातील दारू हद्दपार करण्यासाठी तालुका चमू व गावसंघटनेची काही दिवसांपूर्वी बैठक पार पडली. या बैठकीत दारुमुक्त गाव करण्याचा निर्णय सर्वानुमते पारित करण्यात आला. त्यानुसार गावातील दारू विक्रेत्यांना नोटीस बजावून दारुविक्री न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, काही दारू विक्रेत्यांनी नोटिसला न जुमानता गावात छुप्या मार्गाने दारुविक्री सुरूच ठेवली. त्यामुळे गावातील बचत गटाच्या महिला व गावसंघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावातील अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून व जंगल परिसरात शोधमोहीम राबवून मोठ्या प्रमाणात मोहसडवा, मोहफुलाची दारू व साहित्य जप्त करून नष्ट केले. तसेच पुन्हा दारूविक्री केल्यास पोलिसांच्या स्वाधीन करू, असे अवैध दारू विक्रेत्यांना ठणकावून सांगितले. या अहिंसक कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. यावेळी पोलीस पाटील किशोर सिडाम, गावसंघटनेचे कार्यकर्ते सत्यवान मडावी, महिला बचत गटाच्या ममता मडावी, वनिता सिडाम, अक्कूबाई कोडापे, सावित्रीबाई सिडाम यांच्यासह गावातील व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

दारू गाळण्यासाठी जंगलाचा आधार
अहेरी तालुक्याच्या बहुतांश गावांमध्ये जंगलाचा आधार घेऊन मोठ्या प्रमाणात मोहफूल दारू गाळली जात आहे. नदी, नाले तसेच झुडपी जंगलात दारू गाळून गावात आणली जाते. त्यानंतर लपून राहत्या घरातून दारूची विक्री केली जाते. मुक्तिपथ गाव संघटना व बचत गटाच्या माध्यमातून कारवाई केली जात असली तरी पोलिसांनी जंगलात शोधमोहीम राबविणे आवश्यक आहे, असे मत बचत गटाच्या महिलांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Destroy seven drums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.