Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 09:25 IST2026-05-14T09:24:10+5:302026-05-14T09:25:27+5:30

Delhi Gangrape In Bus: देशाची राजधानी पुन्हा एकदा हादरली आहे. गुरुवारी दिल्लीत एका खाजगी बसमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Shocking: Woman Gang-raped in Private Bus in Delhi; Two Arrested | Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी एक संतापजनक घटना समोर आली. दिल्लीतील एका खाजगी बसमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तत्परता दाखवत दोन नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला प्रवासासाठी निघाली असताना आरोपींनी तिला राणी बाग परिसरातून बसमध्ये सोबत घेतले. त्यानंतर बस नांगलोई परिसराच्या दिशेने नेण्यात आली. निर्जनस्थळी नेल्यानंतर आरोपींनी चालत्या बसमध्येच महिलेवर अत्याचार केला. या घृणास्पद कृत्य झाल्यानंतर पीडितेने धीर न सोडता तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.महिलेच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वेगाने पावले उचलली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ज्या खाजगी बसमध्ये हा गुन्हा घडला, ती बस पोलिसांनी जप्त केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

धावत्या बसमधील या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे दिल्लीत पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. खाजगी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

Web Title : दिल्ली गैंगरेप: बस में महिला से सामूहिक बलात्कार, दो गिरफ्तार

Web Summary : दिल्ली में एक निजी बस में एक महिला के साथ सामूहिक बलात्कार की चौंकाने वाली घटना सामने आई। रानी बाग से बस में चढ़ी पीड़िता के साथ नांगलोई जाते समय यह घटना हुई। पुलिस ने तेजी से कार्रवाई करते हुए दो आरोपियों को गिरफ्तार किया और बस को जब्त कर लिया।

Web Title : Delhi Gang Rape: Woman assaulted in bus, two arrested.

Web Summary : A shocking gang rape occurred in Delhi on a private bus. The victim boarded in Rani Bagh, and the assault happened en route to Nangloi. Police swiftly arrested two suspects and seized the bus, initiating further investigation.