शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
Top Marathi News LIVE Updates: मराठी सक्तीसाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
3
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
4
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
5
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
6
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
7
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
8
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
9
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
10
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
11
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
12
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
13
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
14
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
15
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
16
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
17
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
18
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
19
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
20
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजातील एटीएमसेवा कोलमडली

By admin | Updated: March 8, 2017 02:14 IST

नोटबंदीच्या निर्णयापासून देसाईगंज शहरातील एटीएम सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. संपूर्ण शहराचा भार एसबीआय एटीएमवर होता.

ग्राहक त्रस्त : एसबीआयचे एटीएम चार ग्राहकांनी पैसे काढल्यानंतर पडते बंद देसाईगंज : नोटबंदीच्या निर्णयापासून देसाईगंज शहरातील एटीएम सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. संपूर्ण शहराचा भार एसबीआय एटीएमवर होता. मात्र सदर एटीएममध्येही शुक्रवारपासून बिघाड निर्माण झाल्याने देसाईगंज शहरातील ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. मार्च महिन्याचा प्रारंभ असल्याने अनेकांना कर्जाचे हप्ते भरण्याची घाई आहे. अशातच एटीएम बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. देसाईगंज शहरात स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, युनियन बँक, आयडीबीआय बँक, कोआॅपरेटीव्ह बँक आहे. यातील सर्वच बँकांचे एटीएम शहरात लावण्यात आले आहेत. नोटबंदीपासून या बँकांमध्ये रोकडचा तुटवडा असल्याने या बँकांचे एटीएम नावापुरतेच सुरू आहेत. केवळ एसबीआयचे एटीएम सुरू राहत होते. या एटीएममध्ये अपवाद वगळता नेहमीच पैसे राहत नसल्याने या एटीएमसमोर नोटबंदीच्या कालावधीतही मोठी गर्दी राहत होती. शहरातील बहुतांश ग्राहक एसबीआय एटीएमच्या माध्यमातूनच पैसे काढतात. या एटीएममध्ये शुक्रवारपासून अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. चार ते पाच ग्राहकांनी पैसे काढल्यानंतर सदर एटीएम बंद पडते. याबाबतची तक्रार बँकेकडे केल्यानंतर बँक कर्मचारी दुरूस्त करतात.पण आणखी काही वेळातच सदर एटीएम बंद पडते. त्यामुळे रांगेत लागलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागते. याबाबत एसबीआयचे मॅनेजर बी. यू. वाघमारे यांना विचारणा केली असता, मागील तीन-चार दिवसांपासून एटीएममध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. याबाबतची तक्रार टेक्निशियनकडे करण्यात आली आहे. एक-दोन दिवसात एटीएम दुरूस्त केले जाईल, अशी माहिती लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली. (तालुका प्रतिनिधी)