पात्र असूनही घरकुलाच्या लाभापासून ठेवले वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:54 IST2021-02-05T08:54:01+5:302021-02-05T08:54:01+5:30

गडचिराेली : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत माैशीखांब परिसरातील बेलगाव येथील चार ते पाच गरजू व पात्र लाभार्थ्यांना तत्कालीन ग्रामसभेचे अध्यक्ष ...

Deprived of household benefits despite being eligible | पात्र असूनही घरकुलाच्या लाभापासून ठेवले वंचित

पात्र असूनही घरकुलाच्या लाभापासून ठेवले वंचित

गडचिराेली : स्थानिक पंचायत समितीअंतर्गत माैशीखांब परिसरातील बेलगाव येथील चार ते पाच गरजू व पात्र लाभार्थ्यांना तत्कालीन ग्रामसभेचे अध्यक्ष व ग्रा.पं.सचिवांनी घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवले, असा आराेप गावातील नागरिकांनी गडचिराेली येथे बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला.

पत्रकार परिषदेला अन्यायग्रस्त घरकूल लाभार्थी राईबाई काेठारे, श्रावण कुकुडकर, गुरुदेव काेठारे तसेच सेवकराम बारसागडे आदी उपस्थित हाेते.

राईबाई काेठारे ही निराश्रित विधवा भूमिहीन व दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणारी महिला आहे. मातीचे व बारीक कवेलूच्या घराची पडझड झाल्यामुळे राईबाई ही सध्या दुसऱ्याकडे आश्रयास आहे. पंतप्रधान आवास याेजनेंतर्गत गटग्रामपंचायत माैशीखांब येथील प्रपत्र ‘ब’ यादीत पात्र असताना २६ जानेवारी २०१९ च्या ग्रामसभेत सामूहिक कुटुंबात राहते, असा चुकीचा ठराव पारित केला.

Web Title: Deprived of household benefits despite being eligible