शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

अन्न व औषध प्रशासन विभाग वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST

उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. यासोबतच अनेक ठिकाणी लस्सी, कुल्फी, ऊसाचा रस आणि ज्युस विक्रीची हंगामी दुकाने थाटण्यास सुरूवात झाली आहे. या विक्रेत्यांना अन्न प्रशासन विभागाच्या परवानगीशिवाय यापैकी कोणताही पदार्थ विकता येत नाही. पण तपासणी करायलाच कोणी येणार नाही याची खात्री असल्यामुळे कोणीही विक्रेता परवाना घेण्याच्या भानगडीत पडत नाही. यातून नागरिकांच्या आरोग्याशी मात्र खेळ होत आहे.

ठळक मुद्देएकही अधिकारी नाही : आस्थापनांची तपासणी कागदावरच?

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत अत्यंत महत्वाच्या अशा अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार गडचिरोली जिल्ह्यात चक्क वाºयावर आहे. या विभागातच्या गडचिरोली कार्यालयात पाच अधिकाऱ्यांच्या जागा मंजूर आहेत, पण प्रत्यक्षात येथे एकही नियमित अधिकारी कार्यरत नाही. अशा स्थितीत ४०० किलोमीटरपेक्षा जास्त लांब पसरलेल्या या जिल्ह्याचा कारभार हा विभाग कसा सांभाळत असणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कॉम्प्लेक्स भागातील बरॅक क्रमांक २ मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाचे कार्यालय आहे. पण या कार्यालयात एकही अधिकारी कधीच उपलब्ध नसतात. कारण इथे नियमित अधिकारीच नाही. चंद्रपूर आणि नागपूर येथील अधिकाºयांकडे प्रभार असला तरी त्यांना त्यांच्या मूळ आस्थापनेच्या ठिकाणचा कारभार सांभाळतानाच वेळ कमी पडतो. त्यामुळे गडचिरोलीकडे लक्ष देण्यास त्यांना वेळच नसतो. त्यामुळे हे प्रभारी अधिकारी कधी येतात आणि कधी जातात हे कोणालाच कळत नाही. विशेष म्हणजे ही स्थिती आजचीच नाही तर गेल्या २ वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून ही अवस्था आहे. त्यामुळे या विभागाचा कारभार अधिकाºयांशिवाय चालतो तरी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. यासोबतच अनेक ठिकाणी लस्सी, कुल्फी, ऊसाचा रस आणि ज्युस विक्रीची हंगामी दुकाने थाटण्यास सुरूवात झाली आहे. या विक्रेत्यांना अन्न प्रशासन विभागाच्या परवानगीशिवाय यापैकी कोणताही पदार्थ विकता येत नाही. पण तपासणी करायलाच कोणी येणार नाही याची खात्री असल्यामुळे कोणीही विक्रेता परवाना घेण्याच्या भानगडीत पडत नाही. यातून नागरिकांच्या आरोग्याशी मात्र खेळ होत आहे.

अन्न व औषधांची विक्री निरंकुश
प्रत्येक हॉटेल, खानावळीपासून तर रस्त्यावरील टपरी आणि पानठेल्यापर्यंतच्या प्रत्येक खाद्य पदार्थांच्या विक्रीवर अन्न प्रशासन विभागाचे नियंत्रण असते. खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणची स्वच्छता, वापरल्या जाणाºया साहित्याची शुद्धता याची वेळोवेळी तपासणी आणि परवान्यांचे नुतनीकरण करणे गरजेचे असते. पानठेल्यांमधून विक्री होणाºया प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची तपासणीही हाच विभाग करतो. याच पद्धतीने औषधी विक्री करणाºया मेडिकल स्टोअर्सला नियमित भेटी देऊन तपासणी करण्याचे काम औषधी निरीक्षकांना करावे लागते. मात्र सध्यातरी या सर्व जबाबदाºया कागदावरच पार पाडल्या जात आहे.

अधिकाऱ्याविना कारभार
सहायक आयुक्त (अन्न) यांचा प्रभार चंद्रपूरचे सहायक आयुक्त नितीन मोहिते यांच्याकडे आहे. सहायक आयुक्त (औषधे) यांचा प्रभार नागपूर येथील औषधी निरीक्षक एन.व्ही.लोहकरे यांच्याकडे आहे. याशिवाय येथील निरीक्षकाचाही प्रभार लोहकरे यांच्याचकडे आहे. दोन अन्न निरीक्षकांपैकी एक पद रिक्त आहे तर भरलेल्या एका जागी कार्यरत महिला अधिकारी सायली टावरे डिसेंबर महिन्यापासून दीर्घ रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे सध्या या कार्यालयाचा संपूर्ण कारभार कार्यालयातील कर्मचाºयांच्या भरोशावर सुरू आहे.

टॅग्स :Healthआरोग्य