चामोर्शी तालुक्यात आरोग्य सुविधांत वाढ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:34 IST2021-04-19T04:34:07+5:302021-04-19T04:34:07+5:30

काेराेना रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी तालुकास्तरावर कोविड केअर युनिट, रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन, आरोग्य कर्मचारी, बेड, विलगीकरण कक्ष, नवीन आरटीसीपीआर मशीन ...

Demand for increase in health facilities in Chamorshi taluka | चामोर्शी तालुक्यात आरोग्य सुविधांत वाढ करण्याची मागणी

चामोर्शी तालुक्यात आरोग्य सुविधांत वाढ करण्याची मागणी

काेराेना रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी तालुकास्तरावर कोविड केअर युनिट, रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन, आरोग्य कर्मचारी, बेड, विलगीकरण कक्ष, नवीन आरटीसीपीआर मशीन आदी औषधसाठा उपलब्ध करून आरोग्य सुविधा सक्षम कराव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील कुनघाडा रै., आमगाव महाल, कोनसरी, मार्कंडा (कं.), घोट, रेगडी, भेंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह चामोर्शी शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करावे.

तालुक्यात १३ एप्रिलला २०, १४ ला १२, १५ ला १९, १६ एप्रिलला २० तर १७ एप्रिलला २८ कोरोना रुग्ण आढळून आले. कोरोनाने शहरासह ग्रामीण भागात आता विळखा घातला आहे. त्यामुळे बाधितांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे.

बाॅक्स

हळदवाही व टोला प्रतिबंधित क्षेत्र घोषित

चामाेर्शी तालुका मुख्यालयापासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या हळदवाही टोला येथे १४ व हळदवाही येथे १२ असे एकूण २६ कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे तालुका प्रशासनाने सदर गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गावातून कुणालाही बाहेर जाता येणार नाही व बाहेरून आत येता येणार नाही, याची जबाबदारी तेथील ग्रामपंचायत प्रशासन व तलाठी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार जितेंद्र सिकतोडे यांनी दिली.

Web Title: Demand for increase in health facilities in Chamorshi taluka