वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST2021-03-25T04:35:39+5:302021-03-25T04:35:39+5:30

कोरोना लॉकडाऊन कालावधीत अनेक गरीब मजूर कामापासून वंचित राहिले. तसेच शेतकरी, लहान व्यावसायिक हे सुध्दा आर्थिक अडचणीत आले. ...

Demand for extension of time to pay electricity bill | वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी

वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी

कोरोना लॉकडाऊन कालावधीत अनेक गरीब मजूर कामापासून वंचित राहिले. तसेच शेतकरी, लहान व्यावसायिक हे सुध्दा आर्थिक अडचणीत आले. त्यामुळे या कालावधीतील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचे वीजबिल पूर्णपणे माफ करावे. सद्या विद्युत वितरण कंपनीकडून सक्तीची वीजबिल वसुली सुरू असल्याने नागरिकांची खूप अडचण होत आहे. परीक्षेचे दिवस असल्याने विद्यार्थांच्या अभ्यासावर व त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई थांबविण्यात यावी व वीजबिल भरण्यात मुदतवाढ द्यावी, मागण्यांची पुतर्ता न झाल्यास रिपब्लिकन पक्षातार्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देताना पक्षाचे प्रदेश सचिव प्रा.राजन बोरकर, जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदीरवाडे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवा आघाडी अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता सहारे, जिल्हा सरचिटणीस ज्योती उंदीरवाडे, शहर अध्यक्ष वनमाला झाडे, शहर सचिव माधुरी शंभरकर, शहर उपाध्यक्ष कविता खोब्रागडे, कोषाध्यक्ष ज्योती चौधरी आदी उपस्थित हाेते.

Web Title: Demand for extension of time to pay electricity bill