शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoff Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अहेरी, आरमोरी व कुरखेडात केंद्र सरकारची पुण्यतिथी

By admin | Updated: May 27, 2015 01:41 IST

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला मंगळवारी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला.

गडचिरोली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला मंगळवारी एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला. यानिमित्त केंद्र सरकारच्या अच्छे दिनची पहिली पुण्यतिथी अहेरी, आरमोरी, कुरखेडा व धानोरा येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर कडाडून टीका केली व लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या सरकारचा भंडाफोड केला.
अच्छे दिन आणण्याचा वादा करुन देशाची फसवणुक करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहेरी तालुका काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. त्यानिमित्त मंगळवारी आलापल्ली येथील वीर बाबुराब चौकात तालुकाध्यक्ष महेबुब अली यांच्या नेतृत्वात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आलापल्लीचे ग्रा. पं. सदस्य सलीम शेख यांनी ‘अच्छे दिन’च्या बॅनरवर फुलमाला अर्पन करुन व अगरबत्ती लावून प्रतिकात्मक निषेध व्यक्त केला.
यावेळी ग्रा. पं. सदस्य सलीम शेख, राकाँचे ग्रा. पं. सदस्य कैलास कोरेत, बाबुराव कोहळे, सत्तार कुरेशी, सलीम भाई, रेखा येरमे, वसीम कुरेशी, फिरोज भाई, किरण कोठारे, बिस्मिल्लाह शेख, कालेखाँ कुरेशी, ईसरायील शेख आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
कुरखेडा येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बाजार चौकात अच्छे दिनच्या पहिल्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध जनविरोधी योजनांचा निषेध करण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकटी नागीलवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवनपाटील नाट, पं. स. सभापती शामिना उईके, पं. स. सदस्य प्रभाकर तुलावी, काँग्रेसचे उपाध्यक्ष जयंत हरडे, माजी सरपंच आशा तुलावी, जयश्री धाबेकर, रोहीत धवळे, आनंदराव जांभुळकर, अविनाश डोंगरे, सिराज पठाण, सरपंच जनाबाई उसेंडी, उपसरपंच दामोदर वट्टी, तुकाराम मारगाये, धरमदास उईके, अमोल पवार, सुभाष नैताम, सरपंच संजय कोरेटी, विमल हलामी, सिंधू तितीरमारे, सरिता पोटावी, तानाबाई मानकर, शांताबाई अलामे, यशवंत उईके, हेमंत राऊत, ईश्वर रामकेशर आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
धानोरा येथेही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अच्छे दिनची पुण्यतिथी साजरी केली. तेथे मिलिंद किरंगे, देवानंद भेंडारे, भास्कर सोनुले, नरेश भैसारे, प्रशांत कोराम, पुरुषोत्तम ढवळे आदींनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
आरमोरी येथील गांधी चौकात मोदी सरकारची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी युथ काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष प्रशांत मोटवानी, राजू गारोदे, प्रदेश सचिव आशुतोष बागडे, नंदू खानदेशकर, लॉरेंस गेडाम, सौरभ जक्कनवार, प्रवीण रहाटे, पंकज फुलबांधे, केतन घोसे, तिवारी, साहिल कासवानी, शेषराव कुंभारे, रामदास उईके, क्रिष्णा मट्टे, राजेश्वर होकम, रंजीत जंगम यांच्यासह आरमोरी तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)