दहावीच्या कल चाचणीची डेडलाईन १८ जानेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 05:00 AM2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:26+5:30

महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कल व अभिक्षमता चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीची सुरूवात २७ डिसेंबर २०१९ पासून शाळास्तरावर करण्यात आली आहे. १८ जानेवारी २०२० पर्यंत ही कल व अभिक्षमता चाचणी सर्व शाळांना आटोपून घ्यावयाची आहे. तसे शिक्षण मंडळाचे निर्देश आहेत. मार्च २०२० मध्ये राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कल व अभिक्षमता चाचणी देणे आवश्यक आहे. सदर चाचणी ही मोबाईल व कम्पुटरद्वारे घेतली जात आहे.

Deadline for Class X trial is January 18 | दहावीच्या कल चाचणीची डेडलाईन १८ जानेवारी

दहावीच्या कल चाचणीची डेडलाईन १८ जानेवारी

Next
ठळक मुद्देशिक्षण मंडळाचे निर्देश : जिल्ह्यातील १५ हजार ५४९ विद्यार्थी देताहेत परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कल व अभिक्षमता चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीची सुरूवात २७ डिसेंबर २०१९ पासून शाळास्तरावर करण्यात आली आहे. १८ जानेवारी २०२० पर्यंत ही कल व अभिक्षमता चाचणी सर्व शाळांना आटोपून घ्यावयाची आहे. तसे शिक्षण मंडळाचे निर्देश आहेत.
मार्च २०२० मध्ये राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कल व अभिक्षमता चाचणी देणे आवश्यक आहे. सदर चाचणी ही मोबाईल व कम्पुटरद्वारे घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता दहावीचे एकूण १५ हजार ५४९ विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी कल व अभिक्षमता चाचणीत सहभागी होत आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या पुढाकाराने आणि श्यामची आई फाऊंडेशनच्या सहकार्याने ही कलचाचणी घेण्यात येत आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी विद्यार्थ्यांनी दिलेल्या कल चाचणीचा अहवाल देण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आवडीचे क्षेत्र, त्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी, त्या क्षेत्रातील उच्च शिक्षण व शिक्षण संस्थांची माहिती याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. संस्थेचे विभाग प्रमुख संभाजी भोजने, पुनित मातकर, सुनील उंदीरवाडे, प्रभाकर साखरे हे जबाबदारी सांभाळत आहेत.

सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या- पाटील
शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कल व अभिक्षमता चाचणीत सहभागी करून घेण्याची जबाबदारी संबंधित शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांचा या चाचणीत सहभागी करून भविष्यातील त्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त करावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी केले आहे.

आतापर्यंत सात हजार विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणी
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांच्या इयत्ता दहावीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कल व अभिक्षमता चाचणी घेतली जात आहे. जिल्ह्यात २७ डिसेंबर २०१९ पासून ही चाचणी शाळांमध्ये सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत इयत्ता दहावीच्या सात हजार विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली आहे. या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ४५ आहे. उर्वरित ५५ टक्के विद्यार्थ्यांची कलचाचणी शाळास्तरावर सुरू आहे. शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक या चाचणीच्या कामात गेल्या चार-पाच दिवसांपासून व्यस्त आहेत. विद्यार्थ्यांमधील अभिक्षमता तपासणीसाठी व त्याचा कला जाणून घेण्यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जात आहे.

 

 

Web Title: Deadline for Class X trial is January 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.