शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

हत्तींकडून २० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 5:00 AM

महिनाभरापूर्वी धानोरा तालुक्यात  दाखल झालेले हत्ती आता घाटी अरततोंडी जंगलातून वडसा वनपरिक्षेत्राच्या पिंपळगाव(ह) कक्ष क्र.१२३ येथे पाेहाेचले आहेत. या हत्तींच्या कळपाने परिसरातील पोटगाव, विठ्ठलगाव, विहीरगाव, पिंपळगाव (ह) येथील अंदाजे वीस शेतकऱ्यांच्या शेतात जमा असलेला धान व तूर पीक तसेच शेतातील जलवाहिन्यांच्या पाईपची ताेडफाेड केली. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : मागील दोन दिवसांपासून पिंपळगाव परिसरात हत्तींनी आपले बस्तान मांडले आहे. या परिसरातील जवळपास २० शेतकऱ्यांच्या पिकांचे व इतर साहित्यांचे नुकसान केले आहे. महिनाभरापूर्वी धानोरा तालुक्यात  दाखल झालेले हत्ती आता घाटी अरततोंडी जंगलातून वडसा वनपरिक्षेत्राच्या पिंपळगाव(ह) कक्ष क्र.१२३ येथे पाेहाेचले आहेत. या हत्तींच्या कळपाने परिसरातील पोटगाव, विठ्ठलगाव, विहीरगाव, पिंपळगाव (ह) येथील अंदाजे वीस शेतकऱ्यांच्या शेतात जमा असलेला धान व तूर पीक तसेच शेतातील जलवाहिन्यांच्या पाईपची ताेडफाेड केली. शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. वनविभागाचे कर्मचारी हत्तीच्या कळपावर नजर ठेवून आहेत. लवकरच संबंधित विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून प्रशासनाला सादर करणार असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांनी दिली. परिसरातील रहिवासी नागरिकांमधे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  रानटी हत्ती गावशेजारी असल्याने गावातील वस्तीवर हल्ला होण्याच्या भीतीने नागरिकांमधे दहशत निर्माण झाली आहे. पिंपळगाव (ह) कक्ष क्र.१२३ येथे वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी मागील दोन दिवसांपासून जंगल परिसरात गस्त घालत आहेत. नागरिकांनी हत्तींच्या कळपाजवळ जाण्याच्या प्रयत्न करू नये किंवा हत्तींना त्रास होईल, ते चिडतील असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन यावेळी वनविभागाकडून करण्यात येत आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभागagricultureशेती