पूरग्रस्तांसाठी सीआरपीएफचाही पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:00 AM2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:40+5:30

पुराने ग्रस्त असलेल्या भामरागडवासीयांना जिल्हाभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. नागरिकांचे संरक्षण करण्याबरोबरच नागरिकांच्या स्थानिक अडचणी सोडविण्यास पुढाकार घेणाऱ्या सीआरपीएफने धानोरा येथील नागरिकांना पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन केले. सीआरपीएफकडे सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तू गोळा झाल्या.

CRPF initiative for flood victims | पूरग्रस्तांसाठी सीआरपीएफचाही पुढाकार

पूरग्रस्तांसाठी सीआरपीएफचाही पुढाकार

Next
ठळक मुद्देधानोरावासीयांनी केली मदत : दोन लाख रुपयांचे साहित्य रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : सीआरपीएफ व ११३ बटालियन व धानोरा येथील नागरिकांनी सुमारे दोन लाख रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू गोळा केल्या. सदर मदत सीआरपीएफच्या पुढाकाराने भामरागड येथील पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात आली.
पुराने ग्रस्त असलेल्या भामरागडवासीयांना जिल्हाभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. नागरिकांचे संरक्षण करण्याबरोबरच नागरिकांच्या स्थानिक अडचणी सोडविण्यास पुढाकार घेणाऱ्या सीआरपीएफने धानोरा येथील नागरिकांना पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन केले. सीआरपीएफकडे सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तू गोळा झाल्या. १७ सप्टेंबर रोजी साहित्याने भरलेली दोन वाहने भामरागडकडे रवाना करण्यात आली. सीआरपीएफ ११३ बटालियनचे कमांडंट जी. डी. पंढरीनाथ यांनी जिल्हा कार्यालयात जाऊन सदर मदत सहायक जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांच्याकडे सुपूर्द केली. मदत गोळा करण्यासाठी सीआरपीएफ जवानांसह धानोरा येथील गणेश कुळमेथे, महेश चिमुरकर, मुबारक सय्यद, मुकेश बोडगेवार, सुनील गडपायले, पुष्पराज उंदीरवाडे, सचिन गावतुरे, गणेश चिमुरकर यांच्यासह धानोरा येथील नागरिकांनी सहकार्य केले.

नवोदयच्या माजी विद्यार्थ्यांनी पाठविली मदत
नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची संघटना आहे. डॉ. प्रशांत भरणे, राकेश चटगुलवार, ओम साखरे, सुनील खोब्रागडे, महेश बेझंकीवार, जितेश गावडे, ओमप्रकाश साखरे, किरण राजापुरे, अनिल तिडके, साधू लेकामी, मोरेश्वर भैसारे, रवी दुर्गे राजू मडावी, मनोज झाडे, अतुल फुलझेले या माजी नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मदत गोळा केली. सदर मदत भामरागड तालुक्यातील गुंडूरवाही येथील नागरिकांना देण्यात आली. मदतीमध्ये ५० ब्लँकेट, ५० मच्छरदाणी, दैनंदिन वापराच्या वस्तू, साहित्य आदींचा समावेश आहे. या सर्व वस्तूंच्या जवळपास ५० किट बनवून त्यांचे वितरण पूरग्रस्त नागरिकांना नवोदयच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वत: केले. नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी या निमित्ताने एकत्र आले. तसेच भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी गावांना भेट देऊन तेथील विदारक परिस्थिती जाणून घेतली.

Web Title: CRPF initiative for flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.