आलापल्लीत निकृष्ट धान्याचा पुरवठा

By Admin | Updated: May 28, 2015 00:57 IST2015-05-28T00:57:16+5:302015-05-28T00:57:16+5:30

नवसंजीवनी योजनेंतर्गत येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानांना रेशनचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र सदर धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

Cropped cereals supply in Alpoli | आलापल्लीत निकृष्ट धान्याचा पुरवठा

आलापल्लीत निकृष्ट धान्याचा पुरवठा

नवसंजीवनी योजना : गव्हात खडे तर साखर आहे काळपट
आलापल्ली : नवसंजीवनी योजनेंतर्गत येथील सरकारी स्वस्त धान्य दुकानांना रेशनचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र सदर धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
स्वस्त धान्य दुकानांना पुरविण्यात आलेल्या गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात खडे आहेत. साखर काळपट रंगाची असून तीसुद्धा पाण्याने भिजली आहे. काही साखरेचे गोळे तयार झाले आहेत. एकंदरीतच गहू व साखर निकृष्ट दर्जाची पुरविली गेली आहे. हा प्रकार येथील नागरिकांना लक्षात आल्यानंतर याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारचे निकृष्ट धान्य व साखर उपलब्ध करून देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी. त्याचबरोबर या धान्याची चौकशी करावी, सदर धान्य परत घेऊन नवीन धान्य व साखर पुरवावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. सदर धान्य चार महिन्यांसाठी पुरविण्यात आले आहे. हे वापस न घेतल्यास नागरिकांना तेच धान्य चार महिने वापरावे लागणार आहे. यावेळी ग्राम पंचायत सदस्य कैलाश कोरेत, बालाजी मडावी, दीपक कन्नाके, आरीफ सय्यद, विनोद तलांडे, अजय मडावी, सागर कन्नाके, छोटू कोडापे, विक्की कोरेत, अशोक आत्राम, दीपक उरेन आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Cropped cereals supply in Alpoli