कापूस व मिरची विक्रीसाठी केंद्रच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 06:00 AM2020-01-11T06:00:00+5:302020-01-11T06:00:20+5:30

सिरोंचा शहर तसेच तालुक्यात मिरची व कापसाचे शासकीय आधारभूत केंद्र नाही. तसेच खासगी खरेदी केंद्र तसेच जिनिंग मिलची स्थापना करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी माल निघाल्यानंतर अडचणीत सापडतात. यावर्षी सिरोंंचा तालुक्या धानासोबतच बºयाच क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारच्या वतीने येथे खासगी अथवा शासकीय कापूस खरेदी केंद्र निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

Cotton and chili is not a center for sale | कापूस व मिरची विक्रीसाठी केंद्रच नाही

कापूस व मिरची विक्रीसाठी केंद्रच नाही

Next
ठळक मुद्देउत्पादक शेतकऱ्यांची धावपळ : तेलंगण राज्यात न्यावा लागतो शेतमाल

कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यात धानपिकासोबतच कापूस व मिरची पिकाचीही लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. धानविक्रीसाठी शासनाचे आधारभूत खरेदी केंद्र आहेत, मात्र कापूस व मिरचीसाठी असे कोणतेही केंद्र नसल्यामुळे तालुक्यातील कापूस व मिरची उत्पादक शेतकऱ्यांना पडत्या भावात आपला शेतमाल तेलंगणा राज्यात जाऊन विकावा लागत आहे.
सिरोंचा शहर तसेच तालुक्यात मिरची व कापसाचे शासकीय आधारभूत केंद्र नाही. तसेच खासगी खरेदी केंद्र तसेच जिनिंग मिलची स्थापना करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी माल निघाल्यानंतर अडचणीत सापडतात. यावर्षी सिरोंंचा तालुक्या धानासोबतच बºयाच क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारच्या वतीने येथे खासगी अथवा शासकीय कापूस खरेदी केंद्र निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शेजारच्या तेलंगणा राज्यात कापसाचे पीक घेतले जाते. तेलंगणात अनेक खासगी केंद्र (कापूस जिनिंग मिल) आहेत. कमी अंतरावर हे केंद्र असल्याने तेलंगणातील शेतकऱ्यांना कमी वेळेत कापसाची विक्री करणे सहज शक्य होते. तसेच अपेक्षेनुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळत आहे. मात्र सिरोंचा तालुक्यात एकही केंंद्र नसल्याने येथील शेतकºयांना आपला कापूस दलालांमार्फत तेलंगणाच्या व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. परिणामी दलाल असणारा इसम आपला कमिशन काढत असल्याने शेतकऱ्यांना अल्प भाव मिळत आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आत्मा व कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीच्या वतीने सिरोंचा तालुक्यातही शेतकºयांच्या मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करून धान, कापूस, मिरचीसह भाजीपाला पिकाच्या लागवडीच्या नवनवीन पद्धती प्रात्यक्षिकासह सांगितल्या जात आहेत. वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याने शेतकरी कापूस, मिरची व धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत.
महाविकास आघाडी सरकारने व जि.प.च्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सिरोंचात कापूस खरेदी केंद्र होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

६,७२७ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड
सिरोंचा तालुक्यातील शेतजमीन कापूस पिकाला पोषक असल्याने या तालुक्यात दरवर्षी कापसाचा फेरा वाढत आहे. यंदाच्या खरीप हंगामात सिरोंचा तालुक्यात एकूण ६ हजार ६२७ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड केली आहे. या तालुक्यात प्रती हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल इतक्या कापसाचे उत्पादन या भागातील शेतकरी घेत आहेत. तेलंगणामध्ये कापसाला प्रती क्विंटल ५ हजार ३०० रुपये भाव दिला जात आहे. मात्र सिरोंचा तालुक्यात दलालांमार्फत हाच कापूस तेलंगणात पाठविला जात आहे. स्थानिकस्तरावर दलाल कापसाला क्विंटल मागे ४ हजार ७०० ते ४ हजार ९०० रुपये शेतकºयांना देत आहे. शेतकºयांची ५०० ते ६०० रुपयांनी कमी भाव मिळत आहे. सिरोंचात आधारभूत केंद्र असते तर शेतकऱ्यांना ५ हजार ५०० रूपयापर्यंत कापसाला भाव मिळाला असता. मात्र आधारभूत केंद्र नसल्याने कापूस उत्पादकांची लूट होत आहे.

Web Title: Cotton and chili is not a center for sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.