शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

नामदेवराव उसेंडी यांच्या खांद्यावर काँग्रेसची धुरा

By admin | Updated: October 1, 2014 23:22 IST

निवडणुकीचा माहोल तापायला सुरूवातच होताच गडचिरोली जिल्ह्याच्या काँग्रेसमध्येही दररोज प्रचंड भूकंप होऊ लागले आहे. दोन दिवसांपुर्वी नियुक्ती करण्यात आलेले जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष

गडचिरोली : निवडणुकीचा माहोल तापायला सुरूवातच होताच गडचिरोली जिल्ह्याच्या काँग्रेसमध्येही दररोज प्रचंड भूकंप होऊ लागले आहे. दोन दिवसांपुर्वी नियुक्ती करण्यात आलेले जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष प्रकाश अर्जुनवार यांची आज गुरूवारी उचलबांगडी करीत त्यांच्या जागेवर गडचिरोलीचे मावळते आमदार डॉ. नामदेवराव दल्लुजी उसेंडी यांची प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेस पक्षाची गडचिरोली जिल्ह्यात धुरा सांभाळणारे प्रभारी अध्यक्ष हसनअली गिलानी यांची सोमवारी पक्षशिस्तीचा भंग केला म्हणून पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांच्या जागी माजी खासदार मारोतराव कोवासे गटाचे ज्येष्ठ नेते प्रकाश अर्जुनवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. उसेंडी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून पक्षाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. आज नामांकन पत्र परत घेण्याच्या वेळेपर्यंत पक्षाकडून अनेक नेत्यांनी डॉ. उसेंडी यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत गळ घातली. डॉ. उसेंडी यांनी आपल्या समर्थकांचा शहरात मेळावाही शक्तीप्रदर्शन करण्यासाठी आयोजित केला होता. हा सारा प्रकार सुरू असतांनाच दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. नामदेवराव उसेंडी यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली. तर काँग्रेसचे जुने अध्यक्ष हसनअली गिलानी व प्रकाश अर्जुनवार यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. काँग्रेसने गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात दोन अध्यक्ष बदलविल्याने कार्यकर्त्यांमध्ये आज गोंधळाचे वातावरण होते. डॉ. उसेंडी यांच्या या नियुक्तीचे काँग्रेसच्या त्यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा बदल झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेसच्या अन्य गटातही आता याचे पडसाद पडतील, अशी राजकीय गोटात चर्चा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)