काँग्रेस स्वत:चीच पुण्यतिथी करतेय साजरी

By Admin | Updated: June 7, 2015 02:01 IST2015-06-07T02:01:24+5:302015-06-07T02:01:24+5:30

काँग्रेसच्या हातून केंद्रातील सत्ता जाऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने काँग्रेस पक्ष स्वत:चीच पुण्यतिथी साजरी करीत आहे, ....

Congress is celebrating its own death anniversary | काँग्रेस स्वत:चीच पुण्यतिथी करतेय साजरी

काँग्रेस स्वत:चीच पुण्यतिथी करतेय साजरी

धानोरात कार्यक्रम : देवराव होळी यांचे प्रतिपादन
धानोरा : काँग्रेसच्या हातून केंद्रातील सत्ता जाऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने काँग्रेस पक्ष स्वत:चीच पुण्यतिथी साजरी करीत आहे, असे प्रतिपादन गडचिरोली निर्वाचन क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.
भारतीय जनता पार्टी तालुका शाखा धानोराच्या वतीने किसान भवनात शुक्रवारी केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. डॉ. होळी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, सदानंद कुथे, अनिल पोहोणकर, अविनाश महाजन, शशिकांत साळवे, विश्वनाथ येरमे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष पराग पोरेड्डीवार, विनोद निंबोरकर, गजानन साळवे, लता पुंगाटी, ताराबाई कोटांगले, प्रकाश अर्जुनवार, जगदीश कन्नाके, अजमन रावटे, विजय कुंभारे, गोपाल उईके, दिलीप गावडे, संजय मेश्राम, राखडे, चरणदास कावळे, ईश्वर पुंघाटे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी तालुक्यातील नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य, सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत साळवे तर आभार कैलास गुंडावार यांनी मानले. यावेळी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Congress is celebrating its own death anniversary