शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.मध्ये ई-निविदा प्रक्रियेतही गोंधळ

By admin | Updated: January 4, 2015 23:11 IST

सन २०१४-१५ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात १३ वने व ७ टक्के वनमहसूल अनुदानातून प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

गडचिरोली : सन २०१४-१५ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात १३ वने व ७ टक्के वनमहसूल अनुदानातून प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र या निविदा प्रक्रियेत शासन निर्णयाची पायमल्ली करून ती प्रक्रिया रेटून नेण्यात आली, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे.
ठराविक पुरवठादारांनाच निविदा भरत्या याव्या यासाठी खास मर्जी त्यांच्यावर दाखविण्यात आल्याचे या संपूर्ण प्रक्रियेत दिसून येत आहे. ३० आॅगस्ट २०१४ ची निविदा आयडी न टाकता ९ सप्टेंबर २०१४ ला वेबसाईटवर ती टाकण्यात आली. त्यात ई-निविदा अर्ज विक्री १० सप्टेंबर २०१४ च्या ४ वाजेपर्यंत व स्विकृती त्याच दिवशी ४ वाजेपर्यंत दर्शविण्यात आली. परंतु कार्यालयीन ई-निविदा अटी, शर्तीनुरूप सदर निविदा १५ सप्टेंबर रोजी स्विकृती तारीख दर्शविण्यात आली. अटीनुसार जिल्हा परिषदेत नेहमीच पुरवठा करणाऱ्या ९ निविदा धारकांच्या निविदा एकाच दिवशी ९ वेगवेगळ्या निनावी अर्जांवर रोख रक्कम घेऊन स्विकारण्यात देण्यात आल्या. ई-निविदेला मुदतवाढ १३ नोव्हेंबर २०१४ पर्यंत देताना निविदा अर्ज विक्री १५ नोव्हेंबर व स्विकृती १७ नोव्हेंबर दर्शविण्यात आले. त्यामुळे इतर पुरवठाधारकांना ई-अर्ज खरेदी करून सादर करता आले नाही. विशेष बाब म्हणजे २३ सप्टेंबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार ई-निविदा मुदतवाढ देताना अर्ज विक्री व अर्ज स्वीकृती यामध्ये आठ दिवसांचे अंतर देणे बंधनकारक होते. परंतु असे न करता नेहमीच माल पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना निविदा भरता यावी यासाठी जि. प.प्रशासन प्रचंड मेहरबान झाल्याचे दिसून येत आहे. ई-निविदा प्रक्रिया उघडण्यात आल्यावर अटी व शर्तीप्रमाणे एकाही निविदाधारकाकडे अधिकृत विक्रेत्याचे प्रमाणपत्र नाही. असे असतानाही जि.प. प्रशासनाने त्यांच्यावर खास मर्जी दाखविली आहे.