शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग पॅकेज कार्यक्रमातून पूर्ण होणार

By admin | Updated: October 14, 2014 23:17 IST

महाराष्ट्र-छत्तीसगड-आंध्र प्रदेश राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ चे काम मागील दोन तपापासून रखडले आहे. या महामार्गाचे काम पॅकेज सिस्टीम अंतर्गत केंद्र सरकारचा भूपृष्ठ वाहतूक विभाग

गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड-आंध्र प्रदेश राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ चे काम मागील दोन तपापासून रखडले आहे. या महामार्गाचे काम पॅकेज सिस्टीम अंतर्गत केंद्र सरकारचा भूपृष्ठ वाहतूक विभाग मार्गी लावणार असल्याचे संकेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.आंध्र प्रदेश-छत्तीसगड या तीन राज्यांना जोडणाऱ्या निजामाबाद ते जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ चे काम सन २००० मध्ये बीआरओ मार्फत सुरू करण्यात आले. १४ वर्षाचा कालावधी लोटूनही हे काम अपूर्ण आहे. दरम्यान, बीआरओ येथून परत गेले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले. राज्यात सिरोंचा तालुक्यात सिरोंचा ते पातागुडम हे ५७.३०० किमी अंतर आहे. त्यात रस्ते व नाल्यावरील पूल याचे काम होते. आतापर्यंत ३३ किमीचे काम पूर्ण झाले आहे. अजून २४.३०० किमीचे काम अपूर्ण आहे. सदर २४.३०० किमीचे काम वन विभागाची नक्त मालमत्ता रक्कम (एनपीव्ही) भरण्यासाठी रोखण्यात आले होते. चार वर्षानंतर वन विभागाची एनपीव्ही रक्कम २१ कोटी भरणा करण्यात आली. सदर काम पूर्ण होण्याच्या आधीच अपूर्ण अवस्थेत काम सोडून बीआरओ गेल्याने हे काम रखडूनच आहे. आंध्र प्रदेशात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ चे २७-३०० किमीच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती. यात पाच किमीचे काम अपूर्ण आहे. छत्तीसगड राज्यात भोपालपटणम ते जगदलपूर २३० किमीचे काम सुरू होते. त्यात ६० किमीचे काम अपूर्ण आहे. या कामाबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने काम वेळेवर पूर्ण केले नाही म्हणून संबंधित यंत्रणेवर कारवाईचा अहवाल तयार केला होता. मात्र विद्यमान केंद्र सरकारने या कारवाईला स्थगिती देऊन आता सदर रखडलेले काम पॅकेज सिस्टीमनुसार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. रखडलेल्या कामाचे अडीच अडीच कोटी रूपयांचे पॅच पाडून सदर काम स्थानिक कंत्राटदारांकडून पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे या कामाला गती मिळेल व वेळेत काम पूर्ण होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. १४ वर्षांपासून हे काम रखडले असल्यामुळे आता या कामाला गती येण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)