मानापूरच्या विकासासाठी कटिबद्ध

By Admin | Updated: April 7, 2017 01:19 IST2017-04-07T01:19:00+5:302017-04-07T01:19:00+5:30

परिसरातील नागरिकांनी आपल्याला विधानसभेत नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठविले आहे.

Committed to the development of Manapur | मानापूरच्या विकासासाठी कटिबद्ध

मानापूरच्या विकासासाठी कटिबद्ध

आमदारांचे प्रतिपादन : सभा मंडपासाठी १० लाख रूपये देण्याचे आश्वासन
मानापूर/देलनवाडी : परिसरातील नागरिकांनी आपल्याला विधानसभेत नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठविले आहे. आपण एक सेवक म्हणून गावाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आ. क्रिष्णा गजबे यांनी दिले.
रामनवमीच्या उत्सवानिमित्त मानापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ. क्रिष्णा गजबे बोलत होते. यावेळी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डी. के. मेश्राम, संगमवार, डी. डी. मैंद, अजय पार्वेकर, अनिल आडे, परशुराम मोरघडे, पांडुरंग गुरनुले, बुरे, वाय. बी. कावळे, रामहरी चौधरी, जि. प. सदस्य संपत आळे, पं. स. सदस्य कोकोडे आदी उपस्थित होते. गावामध्ये सामूहिक तसेच वैयक्तिक कार्यक्रम करण्यासाठी इमारत नाही, ही बाब गावकऱ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर दहा लाख रूपयांचा निधी सभा मंडप बांधण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. संचालन लिलाधर चौधरी, प्रास्ताविक रामभाऊ हस्तक तर आभार भाईचंद गुरनुले यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Committed to the development of Manapur