शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

चामोर्शी मार्ग झाला अपघातप्रवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 6:00 AM

चामोर्शी-गडचिरोली मार्गावर अनेक ठिकाण एकेरी व काही ठिकाणी दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. दुचाकी-चारचाकी वाहन सरळ जात असतानाच समोर रस्ता खोदत असल्याचे फलक लावले नसल्याने वाहने पुढे जातात. त्या ठिकाणी रस्ता खोदला राहते. परिणामी वाहनधारकांना पुन्हा परत जाऊन दुसऱ्या बाजूने जावे लागते.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी फलक नाही : खोदकामाचे नियोजन नसल्याने वाहनधारक कमालीचे त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : गडचिरोली-चामोर्शी-आष्टी महामार्गाच्या कामाला सुरूवात झाली असून कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळे दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.चामोर्शी-गडचिरोली मार्गावर अनेक ठिकाण एकेरी व काही ठिकाणी दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. दुचाकी-चारचाकी वाहन सरळ जात असतानाच समोर रस्ता खोदत असल्याचे फलक लावले नसल्याने वाहने पुढे जातात. त्या ठिकाणी रस्ता खोदला राहते. परिणामी वाहनधारकांना पुन्हा परत जाऊन दुसऱ्या बाजूने जावे लागते. आवश्यक त्या ठिकाणी फलक किंवा रस्ता सुरक्षा रक्षक पर्याप्त प्रमाणात नसल्यामुळे वाहतूक व्यवस्थापन पूर्णत: कोलमडले आहे.या मार्गाचे काम सुरू होऊन चार ते पाच महिने झाले परंतु कामाची गती संथ आहे. खोदून ठेवलेल्या रस्त्यावर दिवसातून पाच ते सहा वेळा पाणी मारणे आवश्यक आहे. पाणी मारले जात नसल्याने धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी मोरी बांधकाम सुरू असल्याने वाहनालकांना सुद्धा वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोणत्याही एका बाजूने खोदकाम सुरू असते तर एक बाजू सुरळीत चालू शकली असती. परंतु कुठे एका बाजूने तर कुठे दुसºया बाजूने रस्ता खोदून ठेवला आहे. ज्या ठिकाणी एका बाजूने वाहतूक सुरू आहे ती बाजू अरूंद असल्याने समोरासमोर वाहने आल्यास साईड देताना अडचण निर्माण होत आहे. तसेच ओव्हरटेक करणेही कठीण झाले आहे. आवश्यक त्या ठिकाणी फलक लावावे, अशी मागणी आहे.रात्रीच्या सुमारास अपघाताचा धोकाचामोर्शी हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. भामरागड, अहेरी, सिरोंचा, मुलचेरा आदी तालुक्यांमधील बसगाड्या व इतर वाहने याच मार्गाने गडचिरोलीकडे येतात. त्यामुळे या मार्गावरून नागरिकांची रात्रंदिवस वर्दळ राहते. रात्रीच्या सुमारासही वाहनांची ये-जा सुरूच राहते. रस्ता खोदून ठेवला आहे. तसेच फलक लावले नसल्याने वाहने खोदलेल्या रस्त्यात कोसळत आहेत. धूळ उड्याल्याने रात्रीच्या सुमारास समोरचे काहीच दिसत नाही. त्यामुळे एकमेकांना वाहने धडक देण्याचे प्रमाणही वाढले आहे. योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक