शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी-मार्कंडा मार्ग खड्ड्यात

By admin | Updated: June 28, 2015 02:19 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंड्याकडे जाणारा मार्ग पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

अपघाताची शक्यता : डांबर उखडलेचामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंड्याकडे जाणारा मार्ग पूर्णपणे उखडला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर मार्गावर अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या गंभीर बाबीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने भाविक व नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.मार्र्कंडा देवस्थान चामोर्शीपासून पाच किमी अंतरावर आहे. यापूर्वी या मार्गाची दूरवस्था झाली होती. ही बाब परिसरातील नागरिकांनी बांधकाम विभागाच्या लक्षात आणून दिल्यानंतर एक महिन्यांपूर्वी सदर मार्गाची दुरूस्ती करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मार्गावरील डांबर पूर्णपणे उखडून गेले आहे. अधिक मास असल्याने मार्र्कंडा येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. परिणामी या मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ राहत आहे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोहुर्ली, फराडा, घारगाव येथील नागरिक चामोर्शी येथे येण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून खरेदी केलेले बियाणे बैलबंडी किंवा आॅटोच्या सहाय्याने नेली जात आहे. मात्र या मार्गावर असलेल्या खड्ड्यांचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या गंभीर बाबीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सदर मार्गाच्या दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांकडून देण्यात आला आहे.एक महिन्यापूर्वी बनविलेला मार्ग चार दिवसांच्या पावसाने उखडून गेला. त्यामुळे मार्ग दुरूस्तीच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)