चौडमपल्ली वनपरिक्षेत्रात रानडुकराची शिकार, चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:01:05+5:30

परशुराम गणू मडावी, विनोद भाऊजी ठाकूर, गगन उद्धव निमसरकार व सागर भारत आवथरे रा.अनखोडा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मार्र्कंडा (कं.) चे क्षेत्र सहायक एम.जी.गोवर्धन यांनी वनकर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अनखोडा गाव गाठले. येथील परशुराम गणू मडावी यांच्या घरी जाऊन तपासणी केली असता, परशुराम हा रानडुकराचे मांस कापताना आढळला.

Cattle hunting in Chaudampalli forest reserve, four arrested | चौडमपल्ली वनपरिक्षेत्रात रानडुकराची शिकार, चौघांना अटक

चौडमपल्ली वनपरिक्षेत्रात रानडुकराची शिकार, चौघांना अटक

Next
ठळक मुद्देमांस व साहित्य जप्त : वनकायद्यान्वये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : चौडमपल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या आष्टी बिटामध्ये रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ जून रोजी अनखोडा येथे केली.
परशुराम गणू मडावी, विनोद भाऊजी ठाकूर, गगन उद्धव निमसरकार व सागर भारत आवथरे रा.अनखोडा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मार्र्कंडा (कं.) चे क्षेत्र सहायक एम.जी.गोवर्धन यांनी वनकर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अनखोडा गाव गाठले. येथील परशुराम गणू मडावी यांच्या घरी जाऊन तपासणी केली असता, परशुराम हा रानडुकराचे मांस कापताना आढळला. त्याच्याकडून रानडुकराचे अंदाजे दोन किलो मांस, कुºहाड व विळा आदी साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान वनपरिक्षेत्राधिकारी मनीष पवार यांनी अनखोडात येऊन अधिक तपास केला. शिकार केलेल्या रानडुकराचे मांस विनोद ठाकूर, गगन निमसरकार व सागर आवथरे यांनी विकल्याचे मडावी यांनी सांगितले. त्यानंतर या तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. वनकायद्यान्वये १ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. चारही आरोपींना अटक करून चामोर्शीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपास वनाधिकारी (वन्यजीव) एन.ए.गेडाम यांच्या मार्गदर्शनात वन परिक्षेत्राधिकारी मनीष पवार, क्षेत्रसहायक एम.जी.गोवर्धन, ए.एम. पोतगंटावार, जे.पी.गोवर्धन, एस.डी.सोनवने, ए.एस.कुमोटी, विश्वनाथ मंथनवार करीत आहेत.

Web Title: Cattle hunting in Chaudampalli forest reserve, four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.