शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

काेपेला परिसर विकासापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:33 IST

सिराेंचा तालुका मुख्यालयापासून ४५ किमी अंतरावर काेपेला हे गाव आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ पासून हे गाव पाच किमी ...

सिराेंचा तालुका मुख्यालयापासून ४५ किमी अंतरावर काेपेला हे गाव आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ पासून हे गाव पाच किमी अंतरावर आहे. या गावात पक्के रस्ते व नाल्या नाही. येथे राज्य परिवहन महामंडळाची बसफेरीसुद्धा नाही. आवश्यक कामासाठी नागरिकांना स्वत:ची दुचाकी, सायकल किंवा पायी प्रवास करावा लागताे. येथे आराेग्याच्या अनेक समस्या आहेत. गावालगत एक नाला आहे. पावसाळ्यात येथून रहदारी बंद हाेते. परिसरातील जमीनसुद्धा दगडयुक्त असल्याने याेग्यप्रकारे पीकसुद्धा घेता येत नाही. वनविकास महामंडळ व वन विभागाच्या मजुरीवरच अनेक नागरिक उदरनिर्वाह करतात. काही लाेक कामासाठी तेलंगणात जातात. गावात अंगणवाडी व इयत्ता चाैथीपर्यंत शाळा आहे. परिसरात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण नसल्याने तालुका मुख्यालयात जावे लागते. गावात आराेग्य पथक आहे. परंतु इमारतीत काेणतेही आराेग्य कर्मचारी उपस्थित राहत नाही. आराेग्य सेविका झिंगानूर प्राथमिक आराेग्य केंद्रात राहून सेवा देतात. गावातील आराेग्याचे काम आशावर्कर सांभाळते. दाेन वर्षापूर्वी एका गराेदर महिलेला खासगी वाहनाने रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच प्रसूती झाली. मात्र दुर्दैवाने बाळ दगावले. ये-जा करण्यास याेग्य रस्ता नसल्याने हा प्रसंग ओढवला. त्यामुळे या भागातील नागरिक पक्के रस्ते, नाल्या व अन्य मूलभूत साेयी पुरविण्याची मागणी करीत आहेत. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येते.

बाॅक्स .......

काेपेला गावात हातपंप व विहिरी असतानाही पाणीटंचाई

गावात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण हाेते. गावात १० हातपंप आहेत. परंतु तेथून तेलकट व लालसर पाणी बाहेर येते. हातपंपातील पाणी पिण्यायाेग्य नाही. येथे पाच विहिरीसुद्धा आहेत. परंतु उन्हाळ्यात त्याही काेरड्या पडतात. गावात असलेल्या ६० कुटुंबातील ३५० लाेकसंख्येसमाेर पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण हाेते.