शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

२९ खाणींची ईटीएसद्वारे होणार मोजणी

By admin | Updated: June 13, 2016 02:45 IST

जिल्ह्यातील खाणपट्टाधारकांना गौणखनिजाचे उत्खनन करण्यासाठी दिलेल्या जिल्ह्यातील २९ गौण खनिज खाणींची प्रथमच ईटीएस मशीनद्वारे मोजणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्रथमच प्रयोग : सोमवारपासून प्रारंभ; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णयदिलीप दहेलकर  गडचिरोलीजिल्ह्यातील खाणपट्टाधारकांना गौणखनिजाचे उत्खनन करण्यासाठी दिलेल्या जिल्ह्यातील २९ गौण खनिज खाणींची प्रथमच ईटीएस मशीनद्वारे मोजणी करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धडकले असून जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने या मोजणी व सर्वेक्षणाच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागाचे कर्मचारी व भूकरमापकांकडून सोमवारपासून खाणीच्या मोजणीच्या कामाला प्रारंभ होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, गडचिरोली व चामोर्शी या पाच तालुक्यातील दगड, मुरूम, माती असलेल्या एकूण २९ खाणी उत्खननासाठी खाणपट्टाधारकांना देण्यात आल्या आहेत. या खाणीतून गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक सुरू आहे. मात्र संबंधित खाणपट्टाधारकाने रॉयल्टीच्या प्रमाणात गौणखनिजाचे उत्खनन केले आहे काय? अथवा त्यापेक्षा अधिक गौणखनिजाचे उत्खनन केले आहे. हे तपासण्यासाठी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी प्रथमच ईटीएस मशीनद्वारे गौणखनिज खाणीची मोजणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तसे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी तत्काळ पत्र काढून खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांना या मोजणीच्या कामाचे नियोजन करण्याचे आदेश दिले.त्यानुसार जिल्हा खनिकर्म विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महसूल व भूमीअभिलेख विभागाचे कर्मचारी यांचे पथक या कामासाठी नियुक्त करून सदर मोजणीचे काम करण्याचे निर्देश दिले. संबंधित तलाठी व भूकरमापकांना या खाणींची मोजणी करताना सातबारा, गाव नकाशाची प्रत देण्यात येणार आहे. मोजणीच्या वेळी विहित कार्यपध्दती करणे, स्थळ, पंचनामा व जबाब आदी कार्यवाही करण्यात येणार आहे.