खड्डेमय रस्त्यामुळे अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:57+5:30

वाहून जाण्यासाठी मुख्य मार्गावर मोरी बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागात तीन फूट खोल व दोन फूट रूंदीचा मोठा खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

The bumpy road led to accidents | खड्डेमय रस्त्यामुळे अपघात वाढले

खड्डेमय रस्त्यामुळे अपघात वाढले

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : खडतर प्रवासामुळे वाहनधारक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : धानोरा-रांगी मार्गावरील सोडे गावाजवळ शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी मुख्य मार्गावर मोरी बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागात तीन फूट खोल व दोन फूट रूंदीचा मोठा खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
धानोरा-मोहली-रांगी हा मार्ग अनेक दिवसांपासून दुरावस्थेत आहे. या मार्गावरून धानोरा-ब्रह्मपुरी, रांगी, धानोरा, निमगाव या बसफेºया तसेच खासबी ट्रॅक्स, दुचाकी व चारचाकी वाहने आवागमन करतात. या मार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. आरमोरी, ब्रह्मपुरी, वडसा, वैरागड, कढोली, कुरखेडा येथे जाण्यासाठी धानोरा परिसरातील नागरिक याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे हा मार्ग वर्दळीचा आहे. मात्र धानोरापासून दोन किमी अंतरावर मोठा खड्डा पडल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. खड्डा बुजवून दुरूस्त करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

Web Title: The bumpy road led to accidents