शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांवर बुलडाेझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 05:00 IST

अतिक्रमणामुळे मुख्य मार्गावर रहदारीसह अडथळा निर्माण झाल्याची ओरड हाेत होती. या बाबीची दखल घेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. कुलभूषण रामटेके  यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह पाेहाेचून गुरुवारला शहरातील नैनपूर रोडवरील कापड दुकानाच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. याशिवाय विनापरवाना लागलेले दोन मोबाईल टाॅवर सील केले. 

ठळक मुद्देदाेन टाॅवर केले सील : देसाईगंज पालिकेची अतिक्रमणावर धडक कारवाई

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : मागील अनेक वर्षांपासून शहराच्या विविध भागासह मुख्य मार्गांवर अतिक्रमण करून केलेल्या अनधिकृत बांधकामावर गुरुवारी (दि.११) नगर परिषद प्रशासनाने बुलडोझर चालवला. या कारवाईबद्दल सर्वसामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.अतिक्रमणामुळे मुख्य मार्गावर रहदारीसह अडथळा निर्माण झाल्याची ओरड हाेत होती. या बाबीची दखल घेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. कुलभूषण रामटेके  यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह पाेहाेचून गुरुवारला शहरातील नैनपूर रोडवरील कापड दुकानाच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. याशिवाय विनापरवाना लागलेले दोन मोबाईल टाॅवर सील केले. देसाईगंज येथील नैनपूर रोडस्थित नझुल खसरा क्रमांक २२ मधील प्लॉट क्र २८ व नझुल खसरा क्रमांक २२ मधील प्लॉट क्रमांक २३/१० व माता वाॅर्डातील मालमत्ता क्रमांक ६४ मधील जय अम्बे कापड बाजाराची इमारत बांधकाम पाडण्यात आले. परवानगीपेक्षा अनधिकृत अधिकचे बांधकाम केल्याने  इमारतीवर बुलडाेझर चालविण्यात आला. तसेच विनापरवाना इन्डस कंपनीचा टॉवरचा विद्युत पुरवठा खंडित करून इमारत सील करण्यात आली.  सदर अनधिकृत बांधकामामुळे या मार्गांवरून आवागमन करण्यासह वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान, अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासंदर्भात वारंवार नगर परिषदेतर्फे नोटीस बजावूनही अतिक्रमण न काढता अधिकचे अनधिकृत बांधकाम करण्यासह तीन मजली इमारत उभी केली. दरम्यान, सदर इमारतीचे बांधकामच अनधिकृत असताना वरच्या मजल्यावर नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता दोन मोबाईल टाॅवर उभारले.  नोटीस बजावूनही अतिक्रमण काढण्यात न आल्याने नगर परिषदेचे मुख्याधिकारी  डाॅ. कुलभूषण रामटेके यांच्या नेतृत्वात सदर अतिक्रमण काढण्यासह दोन टाॅवर व संपूर्ण दुकानास सील ठोकण्यात आल्याने शहरातील अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. इतरही ठिकाणच्या अतिक्रमणावर अशीच कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.  प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे. 

मुख्य मार्गावरील अतिक्रमण कायमचशहरात अनेक इमारती अनधिकृतपणे बांधण्यात आल्या आहेत. सदर बांधकाम पाडण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना, मागील अनेक वर्षांपासून देसाईगंज नगर परिषदेने अद्याप कोणतीच कारवाई केली नाही.  बाजारपेठेतील मुख्य मार्गावर अतिक्रमण करून अर्धेअधिक रस्ते गिळंकृत करूनही अशा दुकानदारांवर कोणतीच कारवाई केली नाही. बाजारपेठेच्या मुख्य मार्गांवरील अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मुख्य मार्गावर सोमवारपासून कारवाईशहराच्या मुख्य मार्गावरील अनधिकृत बांधकाम हटविण्याची येत्या सोमवारपासुन धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. कुलभूषण रामटेके यांनी दिली.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण