शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाच्या पोेर्चवर डासांची पैदास

By admin | Updated: June 14, 2016 00:47 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील पोर्चवर शेकडो लिटर पाणी साचून राहत असल्याने या ठिकाणी डासांची पैदास होत असून ...

प्रशासनाचे दुर्लक्ष : साचून राहते पाणी; कचऱ्याच्या ढिगामुळे दुर्गंधीचा त्रासगडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील पोर्चवर शेकडो लिटर पाणी साचून राहत असल्याने या ठिकाणी डासांची पैदास होत असून याचा त्रास रुग्णालयातील रुग्णांनाच होत आहे. याकडे जिल्हा रुग्णालयाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोर्च बांधण्यात आले आहे. या पोर्चच्या वरच्या बाजूस टाकीप्रमाणे बांधकाम करण्यात आले आहे. पावसाचे पाणी या ठिकाणी साचून राहू नये, यासाठी पाईप लावण्यात आले आहेत. मात्र कचऱ्यामुळे सदर पाईप पूर्णपणे बुजले आहे. पाच दिवसांपूर्वी गडचिरोलीत मुसळधार पाऊस झाला. या पावसाचे पाणी पोर्चवरील टाकीमध्ये जमा झाले आहे. पाईप बुजला असल्याने ते पाणी आठ दिवसांपासून जमा होऊन आहे. रुग्ण फेकत असलेल्या खाण्याच्या वस्तू या ठिकाणी कुजून दुर्गंधीयुक्त वास रुग्णांना येत आहे. त्याचबरोबर या पाण्यामध्ये डासांची पैदासही वाढली आहे. सतत पाणी साचून राहिल्यामुळे स्लॅबलाही धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी आठ दिवसांपासून पाणी याच पाण्याच्या टाकीमध्ये साचून आहे. बुजलेला पाईप दुरूस्त न केल्यास पाणी याच ठिकाणी पावसाळाभर साचून राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोर्चच्या वरच्या बाजुला खिडकी आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक या खिडकीमधून अनावश्यक वस्तू फेकतात. त्यामुळे कचऱ्याचा ढीग पोर्चवर जमा झाला आहे. पोर्च तसेच खिडकीची साफसफाई करणे आवश्यक आहे. याकडे रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)