भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे विविध उपक्रम राबवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST2021-06-22T04:24:36+5:302021-06-22T04:24:36+5:30

चामाेर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात २० जून रोजी तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली, याप्रसंगी ते बाेलत हाेते. ...

BJP workers should carry out various activities of the party | भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे विविध उपक्रम राबवावेत

भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे विविध उपक्रम राबवावेत

चामाेर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात २० जून रोजी तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली, याप्रसंगी ते बाेलत हाेते. बैठकीला भाजप कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे, भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, भाजप तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, भाजप गटनेते प्रशांत येगलोपवार उपस्थित हाेते.

जागतिक याेग दिनानंतर २३ जून राेजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती दिन साजरा केला जाणार आहे. ‘डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे विचार व प्रेरणा’ या विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्याख्यान हाेईल. २३ जून ते ६ जुलै सर्व बुथवर वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करावे. २५ जून १९७५ रोजी काॅंग्रेसने आणीबाणी लागू करून लोकशाहीची हत्या केली. हा दिवस काळा दिवस म्हणून पाळणे. २७ जून रोजी ‘मन की बात’ हा कार्यक्रम सर्व बुथवर आणि सार्वजनिक ठिकाणी रेडिओवर एकत्रित ऐकण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन आ. डाॅ. देवराव हाेळी यांनी कार्यकर्त्यांना केले.

===Photopath===

200621\1415img-20210620-wa0116.jpg

===Caption===

आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या कार्यक्रम राबविण्याबाबत च्या बैठकीचे फोटो

Web Title: BJP workers should carry out various activities of the party