विहिरीत मृतावस्थेत आढळला बिबट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST2021-02-05T08:50:13+5:302021-02-05T08:50:13+5:30

वडसा वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शंकरपूर उपक्षेत्रातील पेंदा येथील कुसराम यांच्या शेतातील विहिरीत बिबट पडल्याची माहिती चाेपच्या वनरक्षकांना मिळाली. त्यांनी ...

Bibat found dead in well | विहिरीत मृतावस्थेत आढळला बिबट

विहिरीत मृतावस्थेत आढळला बिबट

वडसा वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शंकरपूर उपक्षेत्रातील पेंदा येथील कुसराम यांच्या शेतातील विहिरीत बिबट पडल्याची माहिती चाेपच्या वनरक्षकांना मिळाली. त्यांनी वनकर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठले व पाहणी केली असता, बिबट मृतावस्थेत आढळून आला. याची माहिती त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी रा.म. शिंदे यांना व शंकरपूरच्या क्षेत्र सहायकांना दिली. त्यानंतर अधिकारी घटनास्थळी पाेहाेचले. मृत बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढून वन परिक्षेत्रात आणण्यात आले. त्यानंतर २ जानेवारीला उपवनसंरक्षक, उपविभागीय वनाधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी व मानद वन्यजीव रक्षकांनी मृत बिबट्याची पाहणी केली.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले व नमुने फाॅरेंन्सीक चाचणीसाठी पाठविले. त्यानंतर मृत बिबट्याचे दहन करण्यात आले. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा शाेध फाॅरेंन्सिक चाचणी अहवाल आल्यानंतरच लागणार आहे.

Web Title: Bibat found dead in well