शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाच्या अनुदानासाठी लाभार्थ्यांची पायपीट कायम

By admin | Updated: September 29, 2014 00:45 IST

गाव गोदरीमुक्त करण्याच्या उद्देशाने वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी शासन स्तरावर १० हजार रूपये अनुदान देण्याचे सांगण्यात येताच, प्रत्येक गावामध्ये शौचालयाचे बांधकाम करण्यात आले.

देसाईगंज : गाव गोदरीमुक्त करण्याच्या उद्देशाने वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी शासन स्तरावर १० हजार रूपये अनुदान देण्याचे सांगण्यात येताच, प्रत्येक गावामध्ये शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. मात्र सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही लाभार्थ्यांना शौचालयाचे अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे तालुक्यातील लाभार्थी अनुदानासाठी वारंवार पंचायत समिती कार्यालयात पायपीट करीत आहेत. मात्र संबंधित लाभार्थ्यांना अजूनपर्यंत शौचालयाच्या अनुदानाचा लाभ देण्यात आला नाही. परिणामी शासनाच्या गोदरीमुक्त गाव संकल्पनेला हरताळ फासल्या जात आहे. वैयक्तिक शौचालय बांधकाम योजना लागू करण्यापूर्वी लाभार्थ्यांना सरळ सेवेने प्रत्येकी १० हजार रूपये देण्यात येतील असे ग्रामपंचायत स्तरावरून सांगण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी स्वत: जवळील आर्थिक कुमक लावून शौचालयाचे बांधकाम केले. उधार, उसनवारीच्या माध्यमातून शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले. मात्र त्यानंतर पंचायत समितीस्तरावरून एक ना अनेक अटींची पूर्तता करण्यास लाभार्थ्यांना सांगण्यात आले. सदर अनुदान शौचालय लाभार्थ्यांना जॉब कार्डच्या आधारे आॅनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील असे सांगण्यात आले. लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र लाभार्थ्यांच्या खात्यात शौचालय अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली नाही. या संदर्र्भात पंचायत समिती स्तरावर चौकशी केली असता. आॅनलाईन पद्धतीने संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यासाठी मेल पाठविला असल्याचे सांगण्यात आले. या पद्धतीत अतिशय अल्प खातेदारांच्या खात्यात १ ते २ हजार रूपये रक्कम जमा झाल्याचे लाभार्थी सांगत आहेत. परंतू आॅनलाईन पद्धतीने देण्यात येणारी ४ हजार ५०० रूपयांची रक्कम अजूनपर्यंत लाभार्थ्यांना अप्राप्त आहे. शौचालयाचे बांधकाम करतांना सुरूवातीला कुठल्याही अटी व शर्तींची पूर्तता करण्याचे बंधन नसल्याचे अनेकांनी प्रशासनाच्या माध्यमातून सांगितले. स्वत:चे गाव गोदरीमुक्त करण्याचा संकल्प घेऊन अनेकांनी स्वेच्छेने शौचालयाचे बांधकाम केले. काही दिवसांनी अटी व शर्तींची पूर्तताही केली. अनुदानाच्या चौकशीसाठी वारंवार पंचायत समिती कार्यालयात हेलपाट्याही मारल्या परंतु लाभार्थ्यांचा काहीही फायदा झाला नाही. त्यामुळे शौचालयाच्या अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना मिळणार की नाही, याबाबत लाभार्थी साशंक आहेत. त्यामुळे शासनाच्यावतीने गाव गोदरीमुक्त करण्याच्या संकल्पनेला हरताळ फासल्या जात आहे. हे विशेष! (तालुका प्रतिनिधी)