बेलगाव पाच दिवसांपासून अंधारात

By Admin | Updated: June 25, 2015 01:55 IST2015-06-25T01:55:27+5:302015-06-25T01:55:27+5:30

सात-आठ दिवसांपूर्वी मेघ गर्जनेसह झालेल्या संततधार वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील खांब वाकले आहेत.

Belgaum from five days in the dark | बेलगाव पाच दिवसांपासून अंधारात

बेलगाव पाच दिवसांपासून अंधारात

निवेदन सादर : अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडीत
कुरखेडा : सात-आठ दिवसांपूर्वी मेघ गर्जनेसह झालेल्या संततधार वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील खांब वाकले आहेत. ताराही तुटून पडल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. विशेष म्हणजे बेलगाव येथील विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे पाच दिवसांपासून नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. महावितरण कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात महावितरण कंपनीच्या कुरखेडा कार्यालयाचे उपविभागीय अभियंत्याकडे नागरिकांनी लेखी निवेदन बुधवारी सादर केले. बेलगाव येथे नव्या विद्युत जनित्राची आवश्यकता असल्याने ते बसवून विद्युत पुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निवेदन देताना पं. स. सदस्य चांगदेव फाये, ग्रा. पं. सदस्य अनिल सहारे, विश्वेश्वर खुणे, वामन कुमरे, नामदेव सलामे, अरूण नैताम, अमित कोल्हे, हंसराज लाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Belgaum from five days in the dark