१५ युवतींना ब्युटी पार्लर प्रशिक्षणाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST2021-01-13T05:35:58+5:302021-01-13T05:35:58+5:30

भामरागड : तालुक्याच्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील १५ सुशिक्षित बेराेजगार युवतींना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली असून, या ...

Beauty parlor training opportunities for 15 young women | १५ युवतींना ब्युटी पार्लर प्रशिक्षणाची संधी

१५ युवतींना ब्युटी पार्लर प्रशिक्षणाची संधी

भामरागड : तालुक्याच्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील १५ सुशिक्षित बेराेजगार युवतींना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली असून, या युवती गडचिराेली येथे ब्युटी पार्लरचे धडे घेत आहेत. विशेष म्हणजे, भामरागड पाेलिसांच्या वतीने दुर्गम भागातील या युवतींना आत्मनिर्भर व स्वावलंबी हाेता येणार आहे. अहेरीचे अपर पाेलीस अधीक्षक साेमय मुंढे यांच्या मार्गदर्शनात भामरागडचे उपविभागीय पाेलीस अधिकारी डाॅ. कुणाल साेनवणे यांनी भामरागड उपविभागात सुशिक्षित युवतींना माेफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्याबाबतची याेजना आखली. भामरागडचे प्रभारी अधिकारी मंगेश कराडे व धाेडराज पाेलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी दुधाळ यांच्याशी समन्वय साधून हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्याची सूचना केली. भामरागड धाेडराज पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रशिक्षणार्थी युवतींना प्रशिक्षणाच्या ठिकाणी निवास व भाेजनाची व्यवस्था माेफत राहणार असल्याची माहिती दिली. युवतींनी धाेडराज व भामरागड येथे येऊन पाेलीस विभागाकडे आपल्या नावाची नाेंदणी केली. उपविभागीय पाेलीस अधिकारी कार्यालयात या युवतींना बाेलावून त्यांना प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर या १५ युवतींना प्रशिक्षण घेण्यासाठी गडचिराेलीला पाठविण्यात आले. या उपक्रमासाठी पाेलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Beauty parlor training opportunities for 15 young women