मुख्यमंत्री राेजगार याेजनेला बँकांचा खाेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:09 IST2021-02-06T05:09:31+5:302021-02-06T05:09:31+5:30

९० टक्के अर्ज केले जातात नामंजूर जिल्हा उद्याेग केंद्रामार्फत पाठविलेल्या अर्जाची बँक आपल्या पध्दतीने तपासणी करते. या अर्जांमध्ये विविध ...

Banks to the Chief Minister's Employment Scheme | मुख्यमंत्री राेजगार याेजनेला बँकांचा खाेडा

मुख्यमंत्री राेजगार याेजनेला बँकांचा खाेडा

९० टक्के अर्ज केले जातात नामंजूर

जिल्हा उद्याेग केंद्रामार्फत पाठविलेल्या अर्जाची बँक आपल्या पध्दतीने तपासणी करते. या अर्जांमध्ये विविध प्रकारच्या त्रुटी काढून अर्ज नामंजूर केले जातात. २०१९-२० मध्ये १९६ अर्ज बँकांना पाठविले हाेते. त्यापैकी केवळ १९ अर्ज मंजूर केले. तर २०२०-२१ मध्ये ९१ अर्जांपैकी ५९ अर्ज मंजूर केले. त्यापैकी २१ जणांना कर्जाचे वितरण केले आहे.

बाॅक्स

१५ ते ३५ टक्केपर्यंत अनुदान

मुख्यमंत्री राेजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्पादन क्षेत्रातील उद्याेगाला ५० लाख रुपये, सेवा क्षेत्रातील व्यवसायाला १० लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शहरी भागातील ओबीसी व सामान्य प्रवर्गातील व्यक्तीला १५ टक्के तर ग्रामीण भागातील ओबीसी व सामान्य प्रवर्गातील व्यक्तीला २५ टक्के तसेच ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग यांना ३५ टक्केपर्यंत अनुदान दिले जाते. तर शहरी भागातील अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग यांना २५ टक्के अनुदान दिले जाते. अनुदानाची रक्कम तीन वर्षांसाठी फिक्स डिपाॅझिट केली जाते. कर्जाची नियमित परतफेड केल्यानंतर तसेच उद्याेग व्यवस्थित सुरू असल्यास अनुदानाची रक्कम दिली जाते.

मागील वर्षात बँकांना प्राप्त अर्ज - १९६

बँकांनी मंजूर केलेले अर्ज - १९

Web Title: Banks to the Chief Minister's Employment Scheme