येरमनारसह पाच ग्रामसभांचे बाेनस मिळालेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST2021-02-05T08:50:16+5:302021-02-05T08:50:16+5:30

गडचिराेली : अहेरी तालुक्यातील येरमनार, गुर्जाखुर्द, काेरेपल्ली, कवठाराम, मिचगुंडा आदी ग्रामसभांनी सामूहिकरित्या २०१९ मध्ये तेंदूपत्ता संकलन केले. परंतु या ...

Bains of five gram sabhas including Yermanar were not received | येरमनारसह पाच ग्रामसभांचे बाेनस मिळालेच नाही

येरमनारसह पाच ग्रामसभांचे बाेनस मिळालेच नाही

गडचिराेली : अहेरी तालुक्यातील येरमनार, गुर्जाखुर्द, काेरेपल्ली, कवठाराम, मिचगुंडा आदी ग्रामसभांनी सामूहिकरित्या २०१९ मध्ये तेंदूपत्ता संकलन केले. परंतु या हंगामातील एकूण २६ लाख ४९ हजार ६३६ रुपयांचा बाेनस ग्रामसभा काेष समित्यांकडे जमा करण्यात आला नाही. त्यामुळे सावलीचे तेंदू कंत्राटदार अमन बाेरकर यांना पाेलीस ठाण्यात बाेलावून तेंदू बाेनस जमा करण्यास सांगावे, असे निवेदन येरमनार ग्रामपंचायतीने पेरमिली पाेलिसांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, २०१९ च्या तेंदू हंगामात सावली येथील अमन सुधाकर बाेरकर यांनी अमन ट्रेडर्स या नावाने येरमनार ग्रामपंचायतींतर्गत तेंदू हंगाम घेतला. कंत्राटदाराच्या नावाने करारनामा करण्यात आला. यावेळी तेंदू कंत्राटदाराचे प्रतिनिधी म्हणून रामदास जराते, शर्मिस वासनिक हे दाेघेही उपस्थित हाेते. परंतु दाेन वर्षे उलटूनही पाचही ग्रामसभांचे तेंदू बाेनसचे पैसे मिळाले नाहीत. येरमनार ग्रामपंचायत व ग्रामसभेच्यावतीने तेंदू कंत्राटदाराला तेंदू हंगाम २०१९ मधील बाेनसचे पैसे जमा करण्यासंदर्भात संपर्क साधला; परंतु कंत्राटदार नेहमी वेळ मारून नेत आहे व पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे तेंदू कंत्राटदार अमन बाेरकर व त्याच्या प्रतिनिधींना पेरमिली पाेलीस ठाण्यात बाेलवावे व तेंदू बाेनसचे पैसे देण्यासंदर्भात निर्देश द्यावे. पैसे न दिल्यास त्यांच्यावर याेग्य कारवाई करावी, अशी मागणी पाचही ग्रामसभांचे अध्यक्ष तसेच पाया तलांडे, विजय आत्राम, अडवे आत्राम, काटा आत्राम, दामा गावडे, चंदू तलांडी यांनी पेरमिली उपपाेलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

Web Title: Bains of five gram sabhas including Yermanar were not received