शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीच्या महिला रुग्णालयाच्या इमारतीला लोकार्पणाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:08 IST

वर्ष उलटले : प्रसूत महिलांना झोपावे लागते जमिनीवर

प्रतीक मुधोळकर लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : गरोदर माता आणि बाल मृत्यू रोखण्यासाठी शासनाने अहेरी येथे पाच वर्षांपूर्वी नवीन महिला व बाल रुग्णालयाचे बांधकाम सुरू केले. एक वर्षापूर्वी रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप या महिला व बाल रुग्णालयाचे उद्घाटन झाले नाले. संपूर्ण भार जुन्या अहेरी उपजिल्हा रुग्णालयावर पडत असून, महिला रुग्णांची खाटांअभावी हेळसांड होत आहे. महिला व बाल रुग्णालयाच्या उद्घाटनाचा मुहूर्त कधी निघणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी तालुक्यांसह तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील महिला व बाल रुग्ण दाखल होत असतात. अहेरी उपजिल्हा रुग्णालयात साधारण तथा सिजेरियन प्रसूती केली जाते. मात्र, ५० बेड संख्या असलेल्या अहेरी उपजिल्हा रुग्णालयात महिलांना आपल्या नवजात बाळांना घेऊन व्हारांड्यात तसेच खाली गादीवर झोपावे लागत आहे. अहेरी उपजिल्हा रुग्णालयात जर प्रसूतीमध्ये काही अडचणी आल्यास महिला रुग्णास किंवा बाळास गडचिरोली किंवा चंद्रपूर येथे रेफर करण्यात येते. 

अहेरी उपजिल्हा रुग्णालयात खाटांची व्यवस्था आहे. त्यात २५ खाटा साधारण वॉर्ड तर २५ खाटा आयसीयू वॉर्ड अशी मांडणी आहे. मात्र, दररोज पाच ते दहा प्रसूती येथे केल्या जातात. त्यामुळे महिला रुग्ण व नवजात बाळांना बेड उपलब्ध होत नाही. अशावेळी महिला व बाळांना ठेवायचे कुठे, असा प्रश्न रुग्णालय प्रशासनास पडत असते. अपघात, इतर रुग्ण, सर्पदंश, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, हायड्रोसिल, मलेरिया, टायफॉइडचे रुग्णसुद्धा अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतात. 

कोट्यवधी रुपये खर्चुन गरोदर महिला व बाल रुग्णालय अहेरी येथे बांधण्यात आले. तिथे आवश्यक यंत्रसामग्रीही लावण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस केंद्रीय सुरक्षा बलांना याच रिकाम्या रुग्णालयात आश्रय देण्यात आला होता. 

कोट्यवधी रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय महिलांच्या व नवजात शिशू यांच्या कामात पडत नसेल तर रुग्णालयाचा फायदा काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. तत्काळ पदभरती करून रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी नागरिकांची आहे.

"अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयाकरिता वैद्यकीय अधिकारी ते सफाई कामगार असे १०० ते १५० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. पदभरतीबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच पदभरतीची प्रकिया सुरु होईल आणि अहेरी महिला व बाल रुग्णालयात सुरू होईल. पदभरती झाली नसल्याने रुग्णालय सुरू करण्यास अडचण येत आहे."- डॉ. शशिकांत शंभरकर, आरोग्य उपआयुक्त

"सदर इमारत प्रशासनाकडे हस्तांतरित झालेली नाही. आधी इमारत आमच्या स्वाधीन होईल. नव्याने पदभरती होईल. तिथे खूप मोठ्या स्टाफची आवश्यकता पडणार आहे. पदभरती झाल्यावर रुग्णालय सुरू होईल. आताही रुग्णांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण खबरदारी आरोग्य विभागामार्फत घेतली जात आहे." - डॉ. माधुरी किलनाके, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीaheri-acअहेरी